Ind vd Aus Playing 11 : तिसऱ्या सामन्याच्या प्लेइंग-11 मध्ये बदल, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?

Six changes in the playing-11 of the Australian team, a chance for India?
Ind vs Aus 3rd T20 Playing 11
Ind vs Aus 3rd T20 Playing 11 Esakal

Ind vs Aus 3rd T20 Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. दरम्यान, टीम इंडिया आजचा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल, तर तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला मालिकेत पुनरागमन करायचे आहे.

मात्र, यादरम्यान आजच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळतील हे जवळपास निश्चित झाले आहे. विशेषत: ऑस्ट्रेलियन संंघातील सहा खेळाडू सामन्याच्या काही तास आधी आपल्या देशात परतले आहेत.

Ind vs Aus 3rd T20 Playing 11
Jasprit Bumrah : 'काहीवेळा शांत राहणंच चांगलं...' बूमबूम बूमरा नाराज, MI मधून जाणार बाहेर? चर्चांना उधाण

ऑस्ट्रेलियन संघाला मालिकेतील पहिले दोन सामने हरल्यानंतर ही मालिका गमावण्याची भीती वाटत नाही. कदाचित त्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघाने दोन सामने संपल्यानंतर सहा खेळाडू बदलले आहेत.

नुकत्याच खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपचा चॅम्पियन बनल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे काही मोजकेच खेळाडू होते. जे टी-20 मालिकाही खेळत होते, पण आता त्यातही बदल झाला आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा स्टीव्ह स्मिथ आणि अॅडम झाम्पा तिसर्‍या टी-20 सामन्यापूर्वीच मायदेशी परतले आहेत. यासह ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि शॉन अॅबॉट ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत. अशा स्थितीत या सर्व खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नसल्याने त्यांची जागा कोणते खेळाडू घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Ind vs Aus 3rd T20 Playing 11
Ind vs Aus : सामन्याआधी मोठी घोषणा! सलग दोन पराभवानंतर कांगारूंनी बदलला अर्धा संघ, 6 खेळाडू बाहेर

भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने पहिल्या आणि दुसर्‍या सामन्यात सेम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवले, म्हणजे कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण आता कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा त्याच इलेव्हनसह मैदानात उतरणार की त्यात काही बदल करणार हे पाहायचे आहे.

आतापर्यंत इशान किशनने पहिले दोन सामने खेळले आहेत, तो ओपनिंग करत नसून तिसऱ्या क्रमांकावर चांगल्या धावा करत आहे. म्हणजेच जितेश शर्मा आत्तापर्यंत बसला आहे, त्याला आजच्या सामन्यात संधी मिळणार का हे पाहायचे आहे. बाकी संघात सध्या कोणतेही बदल दिसत नाहीत. पण कर्णधार सूर्या नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्यावरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ बदलला :

मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, अॅरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.

भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com