Jasprit Bumrah : 'काहीवेळा शांत राहणंच चांगलं...' बूमबूम बूमरा नाराज, MI मधून जाणार बाहेर? चर्चांना उधाण

Jasprit Bumrah Cryptic Instagram Story Starts IPL Transfer Rumours Again Among Fans On Social Media
Jasprit Bumrah Cryptic Instagram Story Starts IPL Transfer Rumours Again Among Fans On Social Media
Updated on

Jasprit Bumrah Instagram Story : आयपीएल 2024 साठी अजून चार-पाच महिने आहेत. पण त्याआधी रिटेंशन यादी जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई आणि गुजरात यांच्यात हार्दिक पांड्याच्या ट्रेड ऑफवरून खूप गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाला.

गुजरात टायटन्सचा दोन हंगामासाठी कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याबद्दल आधी बातम्या आल्या होत्या की, तो मुंबई इंडियन्समध्ये परतणार आहे. यानंतर गुजरात टायटन्सने शेअर केलेल्या रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत हार्दिकचे नाव पाहून सर्वांनाच धक्का बसला. राखून ठेवलेल्या खेळाडूंची अंतिम यादी सादर होईपर्यंत हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला होता.

Jasprit Bumrah Cryptic Instagram Story Starts IPL Transfer Rumours Again Among Fans On Social Media
Ind vs Aus : सामन्याआधी मोठी घोषणा! सलग दोन पराभवानंतर कांगारूंनी बदलला अर्धा संघ, 6 खेळाडू बाहेर

पण या सगळ्या गोंधळात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नाराज दिसत आहे आणि मुंबई इंडियन्समधून बाहेर जाऊ शकतो. कारण जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर असा अंदाज चाहते लावत आहे. बुमराहने इंस्टाग्राम स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, 'कधीकधी शांत राहणे हा सर्वोत्तम उत्तर असते.

जसप्रीत बुमराह सहसा सोशल मीडियापासून खुप लांब राहतो, परंतु यावेळी त्याने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे, ज्याने विचार करण्यास भाग पाडले आहे की, बुमराह कशामुळे गप्प बसला आहे? बुमराहने त्याच्या स्टोरी पोस्ट कोणत्याही मुद्द्याबद्दल काहीही सांगितले नसले तरी, त्याच्यासोबत काहीतरी घडले आहे हे निश्चित आहे, ज्यावर तो गप्प बसून प्रतिक्रिया देत आहे.

Jasprit Bumrah Cryptic Instagram Story Starts IPL Transfer Rumours Again Among Fans On Social Media
Virat Kohli Instagram : " नाकावर पट्टी, कपाळावर जखमा...; कोहलीच्या मारहाणी मागे नेमकं सत्य काय ?

मात्र, सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी बुमराह याविषयी काय मौन बाळगले आहे, असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. काही लोक म्हणतात की, मुंबई इंडियन्स संघात काहीतरी गडबड सुरू आहे. रोहितनंतर कर्णधारपदासाठी बुमराह हाच मुख्य पर्याय होता, मात्र आता अचानक पांड्या आला. या कारणामुळे बुमराह नाराज झाला आहे. काही लोक म्हणतात की, मुंबई इंडियन्सचे कुटुंब आता एकत्र राहिलेले नाही, त्यात फुट पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com