IND vs AUS ODI: सूर्याची ODI कारकीर्द संपली! मालिका गमावल्यानंतर कर्णधारच्या वक्तव्याने उडाली खळबळ

गोलंदाज बदला... फलंदाजीची जागा बदलली... बदलले नाही सूर्यकुमार यादवचे नशीब
suryakumar yadav career-almost-finished rohit sharma
suryakumar yadav career-almost-finished rohit sharma

IND vs AUS ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादव फ्लॉप ठरला. यामुळे 2019 सालानंतर भारताने पुन्हा एकदा घरच्या मैदानावर कांगारूंविरुद्ध वनडे मालिका 1-2 ने गमावली आहे.

सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 0 (1), 0 (1), 0 (1) अशी लाजिरवाणी धावसंख्या केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन सामन्यांत सूर्यकुमार यादवला गोल्डन डक सारख्या लाजिरवाण्या विक्रमाचा अपमान सहन करावा लागला आहे.(Latest Sport News)

suryakumar yadav career-almost-finished rohit sharma
IND vs AUS: गोलंदाज बदला... फलंदाजीची जागा बदलली... बदलले नाही सूर्यकुमार यादवचे नशीब

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला चौथ्या क्रमांकावर दमदार फलंदाजाची गरज होती, मात्र सूर्यकुमार यादवच्या फ्लॉप शोमुळे भारताने कांगारूंना त्यांच्याच घरात वनडे मालिका गमावली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या एका विधानाने खळबळ उडाली आहे.

सूर्यकुमार यादवच्या वनडे कारकिर्दीबाबत रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादव फक्त तीन चेंडू खेळू शकला हे अत्यंत दुर्दैवी आहे.

suryakumar yadav career-almost-finished rohit sharma
Suresh Raina: टी-20 सामन्यात रैनाने अर्धशतक ठोकून घातले थैमान! 14 चेंडूत ठोकल्या 64 धावा

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादव तीन चेंडूंवर बाद झाला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने चुकीचा शॉट निवडला होता.

सूर्यकुमार यादवला आपण आधीच ओळखतो, तो फिरकीविरुद्ध शानदार फलंदाजी करतो. आम्ही त्याला नंतरसाठी वाचवले, जेणेकरून तो शेवटच्या 15-20 षटकांमध्ये मुक्तपणे फलंदाजी करू शकेल.

suryakumar yadav career-almost-finished rohit sharma
IND vs AUS : 'लक्ष्य फार मोठे नव्हते, आम्हाला खेळता आलं नाही...' चूक मान्य करत रोहित खेळाडूंवर बरसला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने खाते न उघडताच दोनदा बाद झाला.

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवले, परंतु या सामन्यात तो डावखुरा फिरकी गोलंदाज अॅश्टन अगरच्या चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला 1-2 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com