IND W vs AUS W 1st Test : अवघ्या 20 व्या वर्षी पदार्पण कसोटी! ऑस्ट्रेलियाने जिंकले नाणेफेक; कर्णधारने 'या' खेळाडूंना दिली संधी

आता ऑस्ट्रेलियाला हरवण्याची संधी! वानखेडे स्टेडियमवर आजपासून महिलांचा कसोटी सामना
IND vs AUS Women 1st Test Richa Ghosh
IND vs AUS Women 1st Test Richa Ghosh

IND vs AUS Women 1st Test Richa Ghosh : इंग्लंडच्या महिला संघाची एकमेव कसोटी सामन्यात शिकार केल्यानंतर भारतीय महिला संघ आता अधिक बलाढ्य असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यास सज्ज झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा एकमेव कसोटी सामना आजपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी इंग्लंडवर सर्वात मोठा कसोटी विजय मिळवला होता. तो सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झाला होता.

IND vs AUS Women 1st Test Richa Ghosh
ICC Rankings : शुभमन गिलला बाबर आझमने दिला मोठा धक्का! सूर्यकुमार अव्वल स्थानावर कायम

ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळपट्ट्यांवर पहिल्या डावात फलंदाजी करणे सोपे असते आणि खेळ जसजसा पुढे जातो तसतसे खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना मदत करते आणि धावा काढणे कठीण होते. या कारणामुळे ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला कसोटी क्रिकेटच्या ४६ वर्षांच्या इतिहासात भारताने मायदेशात अथवा परदेशात ऑस्ट्रेलियाला कधीच पराभूत केलेले नाही. इंग्लंडवर जसा ऐतिहासिक विजय मिळवला तसाच विजय ऑस्ट्रेलियावर मिळवण्याची ही नामी संधी आहे. फिरकीस साथ देणारी खेळपट्टी असेल, तर भारतीयांचे पारडे निश्चितच वरचढ राहील.

ऋचा घोषचे कसोटी पदार्पण

या सामन्यातून अवघ्या 20 व्या वर्षी ऋचा घोष आपल्या कसोटी कारकिर्दीत पदार्पण करत आहे. सामन्यापूर्वी त्याला कसोटी संघाची कॅप देण्यात आली होती. भारताकडून कसोटी सामना खेळणारी ती 94वी महिला खेळाडू आहे. त्याचवेळी लॉरेन चीटल ऑस्ट्रेलियाकडून पहिला सामना खेळत आहे.

भारतीय महिला संघ : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com