Ind vs Ban : भारत-बांगलादेश सामन्याआधी कर्णधारला दुखापत, खेळणार का आजचा सामना? कोचने दिली मोठी अपडेट

Ind vs Ban shakib al hasan Injury Update
Ind vs Ban shakib al hasan Injury Update sakal

Ind vs Ban shakib al hasan Injury Update : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्ड कप 2023 मधील सतरावा सामना आज पुण्यात खेळला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. टीम इंडिया आपला शेवटचा सामना जिंकून येत आहे. बांगलादेशला शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

आज कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच कळणार आहे. पण सामन्यात कर्णधार शाकिब अल हसन खेळणार का नाही, याची चर्चा सुरू आहे. यावर प्रशिक्षकाने एक मोठा अपडेट दिला आहे.

Ind vs Ban shakib al hasan Injury Update
Team India Semi Final Scenario : बांगलादेशला हरवून भारतीय संघ पोहोचणार उपांत्य फेरीत? जाणून घ्या समीकरण

बांगलादेशचे प्रशिक्षक हथुरुसिंघा पत्रकार परिषदेत म्हणाले, शाकिबने काल नेटमध्ये चांगली फलंदाजी केली. आम्ही फक्त याच्या स्कॅन अहवालाची वाट पाहत आहोत. तो खेळायला तयार नसेल तर आम्ही त्याच्यासोबत रिस्क घेणार नाही. पण तो भारताविरुद्धचा सामना नक्कीच खेळेल अशी शक्यता आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान शाकिब अल हसनला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.

Ind vs Ban shakib al hasan Injury Update
Ind vs Ban Weather Update : पुण्यातून मोठी अपडेट...! भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे काळे ढग?

शाकिब अल हसनची टीम इंडियाविरुद्धची कामगिरीही अप्रतिम आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये त्याने 85 चेंडूत 80 धावांची खेळी केली होती. गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शकिबने 5 विकेट घेतल्या होत्या. मात्र तो सामना भारताने जिंकला. शाकिबला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बांगलादेश संघ : शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद हसन तमीम, नजमुल हसन शांतो, तौहीद हृदय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम आणि तंजीम हसन साकिब.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com