IND vs BAN: कोहलीसाठी अत्यंत वाईट दिवस! आधी सोडले चार झेल नंतर केली शिवीगाळ...

virat kohli bad day in dhaka
virat kohli bad day in dhakasakal

IND vs BAN Virat Kohli Dropped Four Catches: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळल्या जात आहे. शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने खूपच खराब क्षेत्ररक्षण केले. त्याने बांगलादेशी खेळाडूंना अनेक संधी दिल्या. अनुभवी खेळाडू विराट कोहली झेल सोडण्यात आघाडीवर होता. तो जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे पण कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याने चार झेल सोडले. याशिवाय फलंदाजीतही तो अपयशी ठरला.

virat kohli bad day in dhaka
Year Ender 2022 : सिंधूने इतिहास रचला; Forbes च्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांच्या यादीत मानाचे स्थान

अक्षर पटेलच्या 44व्या षटकात कोहलीने लिटन दासला जीवदान दिले. अक्षरचा चेंडू लिटनच्या बॅटला लागून स्लिपमध्ये गेला. विराटला तो झेल घेता आला नाही. त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर लिटनचा आणखी एक झेल कोहलीने सोडला. त्याला चेंडूची दिशा कळत नव्हती. त्यानंतर कोहलीने अश्विनच्या चेंडूवर तिसऱ्यांदा लिटनचा झेल सोडला.

virat kohli bad day in dhaka
Virat Kohli : मेहदीलने बाद केल्यानंतर भडकलेल्या विराटने केली शिवीगाळ; पंच आले म्हणून...

लिटनशिवाय तस्किन अहमदलाही विराटने जीवदान दिले. तस्किन 10 धावांवर खेळत असताना कोहलीने त्याचा झेल सोडला. विराटच्या चुकांचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला. लिटनने संघाकडून सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याचवेळी तस्किनने 46 चेंडूत नाबाद 31 धावा करत बांगलादेशला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.

virat kohli bad day in dhaka
BAN vs IND : रात्र वैऱ्याची! मेहदीने भारताची टॉप ऑर्डर उडवली; 45 धावा करतानाही झाली दमछाक

विराट कोहलीला केवळ क्षेत्ररक्षणच नाही तर फलंदाजीतही वाईट दिवस होता. त्याला दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराजने बाद केले. कोहलीचा झेल मोमिनुल हकने घेतला. पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या विराटला 22 चेंडूत केवळ एक धाव करता आली. बाद झाल्यानंतर कोहली इतका संतप्त झाला की त्याने बांगलादेशी खेळाडूंना फटकारले. विराट बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना बांगलादेशच्या तैजुल इस्लामने त्याला काहीतरी बोला. यावर कोहलीचा राग आणखी वाढला. तो तैजुलकडे जात होता. दरम्यान अंपायर आणि बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन यांनी मध्ये येऊन विराट कोहलीला शांत केले. विराटने तैजुलबद्दल शाकिबकडे तक्रार केली आणि त्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

आतापर्यंतच्या सामन्यात काय घडलं?

बांगलादेशने या सामन्यात पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला आणि भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेट गमावत 45 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 100 धावांची गरज आहे, तर बांगलादेश विजयापासून सहा विकेट दूर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com