'विराटचा लाडला' राहुल फॉर्मात; दिवसअखेर टीम इंडिया ४ बाद १२५

IND vs ENG: 'विराटचा लाडला' राहुल फॉर्मात; भारत ४ बाद १२५ Ind vs Eng 1st Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ पाऊस आणि अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे थांबवण्यात आला Ind vs Eng 1st Test Day 2 Live Updates KL Rahul fifty gives Team India upper hand over England vjb 91
KL Rahul
KL Rahul

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताने खेळावर वर्चस्व राखले. भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने दमदार अर्धशतक झळकावले. शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्या गैरहजेरीत राहुलने मिळालेल्या संधीचे सोने केले. रोहित शर्मासोबत त्याने ९७ धावांची सलामी दिली. रोहित (३६) बाद झाल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळू शकली नाही. तशातच पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद १२५ धावा केल्या. जेम्स अँडरसनने २ तर ओली रॉबिन्सनने १ बळी टिपला.

KL Rahul
पहिला बॉल ट्रायल असतो यार.. चाहत्यांकडून विराट भन्नाट ट्रोल

इंग्लंडचा डाव १८३ धावांवर गडगडल्यानंतर भारतीय सलामीवीरांनी झकास सुरूवात केली. ९७ धावांची सलामी दिल्यानंतर रोहित शर्मा उसळत्या चेंडूवर फटका मारताना झेलबाद झाला. चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर सेट होईपर्यंत अँडरससने त्याला माघारी पाठवले. पुढच्याच चेंडूवर कर्णधार विराट कोहलीदेखील शून्यावर बाद झाला. उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडून अपेक्षा असताना तो धावचीत झाला. लोकेश राहुलने एकाकी झुंज दिली आणि संघाला थोडं स्थैर्य दिलं. दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला तेव्हा राहुल नाबाद ५७ तर ऋषभ पंत नाबाद ८ धावांवर खेळत होता.

KL Rahul
Video: ऋषभ पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे...

दरम्यान, इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडला पहिल्यात षटकात धक्का बसला. रॉरी बर्न्स शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर क्रॉली आणि सिबली यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण क्रॉली २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सिबलीदेखील १८ धावांवर तंबूत परतला. बेअरस्टोने काही काळ रूटची चांगली साथ दिली. तो २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडचे गडी झटपट बाद झाला. सॅम करनने काही काळ झुंज दिली. पण त्याला दुसरीकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे इंग्लंडला १८३ धावांपर्यंतच मजल मारता आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com