रोहित-राहुल जोडीची धमाल; १० वर्षांत पहिल्यांदाच केली कमाल!

रोहित-राहुल जोडीची धमाल; १० वर्षांत पहिल्यांदाच केली कमाल! भारताच्या ओपनर जोडगोळीने केली दमदार फलंदाजी Ind vs Eng 1st test Rohit Sharma KL Rahul gives highest opening stand in SENA countries in last 10 Years vjb 91
KL-Rahul-Rohit-Sharma
KL-Rahul-Rohit-Sharma

Ind vs Eng 1st Test: भारतीय वेगवान गोलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडला अवघ्या १८३ धावांमध्ये गुंडाळला. बुमराह, शमी, सिराज आणि शार्दूल यांच्या गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकीनाऊ आणले. इंग्लंडच्या डावाला बुमराहने सुरूंग लावला. इंग्लंडचा डाव संपल्यानंतर भारतीय सलामीवीरांनी अतिशय सावध आणि संथ अशी खेळी केली. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी ९७ धावांची सलामी भागीदारी केली. त्यासोबत या जोडीने दमदार विक्रम केला.

KL-Rahul-Rohit-Sharma
साहेबांची दाणादाण उडवणाऱ्या पिचवर रोहित-राहुलची खास हॅटट्रिक

भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी दमदार खेळ केला. त्यांनी सलामीसाठी ९७ धावांची भागीदारी केली. भागीदारी शतकाच्या नजीक असताना रोहित बाद झाला. पण SENA देशांमध्ये ही भारतीय सलामीवीरांची गेल्या १० वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या SENA देशांमध्ये गेल्या १० वर्षात भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वाधिक भागीदारी ठरली. राहुल आणि रोहितने दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र छान खेळून काढले पण रोहित उसळत्या चेंडूवर बाद झाला आणि भागीदारी तुटली.

KL-Rahul-Rohit-Sharma
Video: मराठमोळ्या शार्दूलने इंग्लंडच्या कर्णधाराला गुंडाळलं...

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला पहिल्यात षटकात धक्का बसला. रॉरी बर्न्स शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर क्रॉली आणि सिबली यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण क्रॉली २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सिबलीदेखील १८ धावांवर तंबूत परतला. बेअरस्टोने काही काळ रूटची चांगली साथ दिली. तो २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडचे गडी झटपट बाद झाला. सॅम करनने काही काळ झुंज दिली. पण त्याला दुसरीकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे संघाचा डाव १८३ धावांमध्ये आटोपला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com