Ind vs Eng : द्विशतक ठोकणाऱ्या यशस्वी जैस्वालला नाही तर 'या' खेळाडूला मिळाला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार

India vs England Test Series News 2024 :
jasprit bumrah gets player of the match award who not yashasvi jaiswal cricket news in marathi
jasprit bumrah gets player of the match award who not yashasvi jaiswal cricket news in marathi

Ind vs Eng 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला होता जो पाहुण्या संघाने जिंकला होता. विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात आलेला दुसरा सामना 106 धावांनी जिंकून भारताने बरोबरी साधली. या सामन्यात यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात भारताकडून द्विशतक झळकावले. या स्फोटक खेळीमुळेच भारताला विजयाचा पाया रचता आला.

jasprit bumrah gets player of the match award who not yashasvi jaiswal cricket news in marathi
Ind vs Eng : दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पराभव करताच रोहित शर्माने मोडला धोनीचा 'हा' मोठा विक्रम, आता फक्त...

विशाखापट्टणम कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधारासह भारतीय संघाचे संपूर्ण खेळाडू धावा करण्यात अपयशी ठरला. फक्त एकट्या यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात द्विशतक झळकावले आणि संघाची धावसंख्या 396 धावांवर नेली. त्याने 290 चेंडूत 19 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 209 धावा केल्या. 5 सामन्यांपूर्वी कसोटी पदार्पण करणाऱ्या या युवा खेळाडूचे हे पहिलेच द्विशतक आहे. भारताच्या एकाही फलंदाजाने पहिल्या डावात 35 धावाही केल्या नाहीत, तेथे या युवा खेळाडूने द्विशतक झळकावले होते.

jasprit bumrah gets player of the match award who not yashasvi jaiswal cricket news in marathi
WTC25 Point Table IND vs ENG : इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची WTC पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी

मात्र तरी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले नाही. पहिल्या डावात 396 धावा केल्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध 143 धावांची आघाडी घेतली होती. यामध्ये जसप्रीत बुमराहच्या 6 विकेट्सचा मोठा वाटा होता. यानंतर बुमराहने दुसऱ्या डावात भारताने दिलेल्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडविरुद्ध पुन्हा 3 विकेट घेत सामना फिरवला.

सामन्यात 9 विकेट घेणाऱ्या या अनुभवी गोलंदाजाची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. बुमराहने अशा वेळी भारतासाठी विकेट घेतली जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com