WTC25 Point Table IND vs ENG : इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची WTC पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी

WTC25 Point Table IND vs ENG : पहिल्या सामन्यानंतर भारताची wtc गुणतालिकेत मोठी घसरण झाली होती.
WTC25 Point Table IND vs ENG
WTC25 Point Table IND vs ENGESAKAL

WTC25 Point Table IND vs ENG : भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी पराभव केला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1 - 1 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासोबतच भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेतली आहे. भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

WTC25 Point Table IND vs ENG
IND vs ENG : टॉम हार्टली बाद होता की नाबाद...? अश्विनच्या गोलंदाजीवर झेल अन् पायचीतचा गोंधळ

भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी पराभव केला. भारताने मालिकेत 1 - 1 अशी आघाडी घेतली. मालिकेतील पहिला हैदराबाद येथील कसोटी सामना इंग्लंडने जिंकून भारताला टेन्शन दिलं होतं. भारत ही कसोटी 28 धावांनी हरला होता.

भारताने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर त्याचा परिणाम WTC Point Table वर झाला होता. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर पोहचला होता. ही भारताची मोठी घसरण होती.

मात्र भारताने दुसऱ्या कसोटीत जोरदार पुनरागमन करत 106 धावांनी विजय मिळवला अन् 52.77 विनिंग पर्सेंटेज मिळवत दुसरे स्थान गाठले. सध्या ऑस्ट्रेलिया WTC पॉाईंट टेबलमध्ये 55 विनिंग पर्सेंटेजसह अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका 50 पर्सेंटेज घेत तिसऱ्या स्थानावर आहे.

WTC25 Point Table IND vs ENG
Ind vs Eng 2nd Test Day 4 : बेसबॉल का घमंड टूटा... अश्विन-बुमराह कहर; भारताचा 106 धावांनी विजय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप : कोणता संघ कुठल्या स्थानावर?

  1. ऑस्ट्रेलिया - 55 पॉईंट पर्सेंटेज

  2. भारत - 52.77 पॉईंट पर्सेंटेज

  3. दक्षिण आफ्रिका - 50 पॉईंट पर्सेंटेज

  4. न्यूझीलंड - 50 पॉईंट पर्सेंटेज

  5. बांगालदेश - 50 पॉईंट पर्सेंटेज

  6. पाकिस्तान - 36.66 पॉईंट पर्सेंटेज

  7. वेस्ट इंडीज - 33.33 पॉईंट पर्सेंटेज

  8. इंग्लंड - 25 पॉईंट पर्सेंटेज

  9. श्रीलंका - 0 पॉईंट पर्सेंटेज

WTC25 Point Table IND vs ENG
IND vs ENG : टॉम हार्टली बाद होता की नाबाद...? अश्विनच्या गोलंदाजीवर झेल अन् पायचीतचा गोंधळ

भारत ज्यावेळी दुसरी कसोटी खेळण्यासाठी विशाखापट्टणम येथे आला होता त्यावेळी इंग्लंडच्या बॅझबॉल क्रिकेटच्या तणावाखाली होता. मात्र दुसऱ्या कसोटीत भारताने त्यांचे प्रमुख खेळाडू नसताना देखील दमदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात 209 धावांची द्विशतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या.

भारताने पहिल्या डावात इंग्लंडला 253 धावांवर रोखले. जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत 6 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडकडून झॅक क्राऊलीने सर्वाधिक 76 धावा केल्या.

दुसऱ्या डावात शुभमन गिलने 104 धावांची शतकी खेळी करत भारताला 399 धावांची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात झॅक क्राऊलीने पुन्हा एकदा दमदार खेळी केली. त्याने 73 धावा केल्या. मात्र भारताकडून पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं.

त्याने 3 विकेट्स घेतल्या तर अश्विनने देखील 3 विकेट्स घेत भारताच्या विजयाला हातभार लावला. भारताने सामना 106 धावांनी जिंकत मालिकेत 1 - 1 अशी आघाडी घेतली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com