esakal | 'टीम इंडिया'च्या दमदार फलंदाजीनंतर इंग्लंडचं सामन्यात कमबॅक!
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Gone-England

'टीम इंडिया'च्या दमदार फलंदाजीनंतर इंग्लंडचं सामन्यात कमबॅक!

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng 4th Test Live Updates: भारताने गमावले तीन बडे फलंदाज

Ind vs Eng 4th Test Live Updates Lunch Break: कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात थोडाशा चुका केल्या. पहिल्या सत्रातील पहिला तासभर संयमी पद्धतीने खेळून काढल्यानंतर शेवटच्या काही वेळात भारताने तीन बड्या खेळाडूंच्या विकेट्स गमावल्या. १७१ धावांची आघाडी घेत विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाने सुरू केलेला चौथ्या दिवसाचा खेळ उपहाराच्या सत्रापर्यंत थोडासा इंग्लडकडे झुकला. ३ बाद २७० या धावसंख्येवरून सुरू झालेला खेळ उपहाराची विश्रांती झाल्यावर ६ बाद ३२९ धावांवर थांबला आणि टीम इंडियाने २३० धावांची आघाडी घेतली.

हेही वाचा: "मला माहिती होतं..."; दमदार शतकानंतर रोहितची खास प्रतिक्रिया

भारताने पहिल्या सत्रात ५९ धावांची भर घातली पण त्या बदल्यात विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा या तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. सुरूवातीच्या तासाभरात जाडेजा आणि कोहली जोडी संयमी खेळ करत होती. त्यानंतर रविंद्र जाडेजा (९) आणि अजिंक्य रहाणे (०) दोघेही ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाले. जाडेजासाठी भारताकडून वापरण्यात आलेला रिव्ह्यू वाया गेला. रहाणेने वापरलेल्या रिव्ह्यूमुळे त्याला जीवदान मिळाले होते, पण थोड्या वेळात धाव न करताच त्याला पायचीत व्हावे लागले. विराट अप्रतिम फॉर्ममध्ये खेळत होता. ऋषभने त्याला चांगली साथ दिली. पण मोईन अली गोलंदाजीसाठी आला आणि अतिशय सहज अशा प्रकारचा झेल विराटने स्लिपमध्ये दिला. विराट ९६ चेंडूत ४४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शार्दूल ठाकूरने (११*) सत्र संपेपर्यंत पंतला (१६*) साथ दिली.

अशी गमावली विराटने आपली विकेट (Video)-

त्याआधी, भारताचा पहिला डाव १९१ वर तर इंग्लंडचा पहिला डाव २९० वर आटोपला. इंग्लंडने घेतलेल्या ९९ धावांच्या आघाडीनंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली. लोकेश राहुलने ४६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीने १५०+ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. रोहितने दमदार शतक (१२७) तर पुजाराने झुंजार अर्धशतक (६१) ठोकले.

loading image
go to top