पंत, शार्दूलची अर्धशतके; टीम इंडियाच्या शेपटाचा इंग्लंडला दणका

Shardul-Thakur-Rishabh-Pant
Shardul-Thakur-Rishabh-Pant

Ind vs Eng 4th Test: भारताची ४०० पार मजल; घेतली भक्कम आघाडी

Ind vs Eng 4th Test Live Updates Tea Break: भारतीय संघाने पहिल्या सत्राच्या शेवटी केलेल्या चुका सुधारत दिवसाचे दुसरे सत्र आपल्या नावे केले. ऋषभ पंत आणि शार्दूल ठाकूर या दोघांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. शार्दूलने ६० तर पंतने ५० धावांची खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव दोघांनी सत्र संपेपर्यंत गोलंदाजी झोडपून काढली. त्यामुळे चहापानाच्या विश्रांतीपर्यंत भारताने ८ बाद ४४५ धावांपर्यंत मजल मारली आणि ३४६ धावांची भक्कम आघाडी घेतली.

चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांच्या थोडाशा चुका झाल्या. पहिल्या सत्रातील पहिला तासभर संयमी पद्धतीने खेळून काढल्यानंतर शेवटच्या काही वेळात भारताने तीन बड्या खेळाडूंच्या विकेट्स गमावल्या. १७१ धावांची आघाडी घेत विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाने सुरू केलेला चौथ्या दिवसाचा खेळ उपहाराच्या सत्रापर्यंत थोडासा इंग्लडकडे झुकला. ३ बाद २७० या धावसंख्येवरून सुरू झालेला खेळ उपहाराची विश्रांती झाल्यावर ६ बाद ३२९ धावांवर थांबला आणि टीम इंडियाने २३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात दमदार फटकेबाजी करत शार्दूल-पंत जोडीने ही आघाडी पुढे वाढवली.

Shardul-Thakur-Rishabh-Pant
INDvsENG: आदमी एक और पराक्रम ५.. शतकवीर 'हिटमॅन'चा नादच खुळा

त्याआधी, भारताचा पहिला डाव १९१ वर तर इंग्लंडचा पहिला डाव २९० वर आटोपला. इंग्लंडने घेतलेल्या ९९ धावांच्या आघाडीनंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली. लोकेश राहुलने ४६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीने १५०+ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. रोहितने दमदार शतक (१२७) तर पुजाराने झुंजार अर्धशतक (६१) ठोकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com