esakal | इंग्लंडचा मालिकेवर कब्जा, स्फोटक फलंदाजीनं स्मृतीनं मनं जिंकली
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्लंडचा मालिकेवर कब्जा, स्फोटक फलंदाजीनं स्मृतीनं मनं जिंकली

इंग्लंडचा मालिकेवर कब्जा, स्फोटक फलंदाजीनं स्मृतीनं मनं जिंकली

sakal_logo
By
नामदेव कुंभार

निर्णायक टी-20 सामन्यात 8 विकेटनं विजय मिळवत इंग्लंड महिला संघाने तीन सामन्याची मालिका 2-1 च्या फरकाने खिशात घातली. भारतीय संघाकडून स्मृती मानधना हिने स्फोटक फलंदाजी करत चाहत्यांची मनं जिंकली. निर्णायक सामन्यात स्मृतीने 70 धावांची धडाकेबाज खेळी केली. पण डॅनियल वॅटच्या 89 धावांच्या खेळीमुळे स्मृतीची तुफानी खेळी वाया गेली.

कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधनाच्या तुफानी 70 धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा केल्या. प्रत्त्युत्तदाखल इंग्लंड संघाने 8 गडी राखून हे आव्हान पार केलं. पहिल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली होती. दुसरा सामना जिंकत भारतीय महिला संघाने मालिकेत बरोबरी साधली होती. पण निर्णायक सामन्यात इंग्लंड संघाने बाजी मारली.

हेही वाचा: दिलासा नाहीच; राज्यातील कोरोना निर्बंध तुर्तास कायम

स्मृती मानधना हिने 51 चेंडूत तुफानी 70 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मानधना हिने दोन षटकार आणि 8 चौकार लगावले. कर्णधार हरमनप्रीतसोबत स्मृतीने तिसऱ्या विकेटसाठी महत्वाची 68 धावांची भागिदारी केली. ही जोडी वगळता एकाही भारतीय महिला फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. स्मृती मनधना हिच्या दमदार फलंदाजीमुळे चाहत्यांची मनं जिंकली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी स्मृती मानधना हिचे कौतुक केलं आहे.

हेही वाचा: इंग्लंडमधील भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण

हेही वाचा: राज्यात लवकरच महाभरती; MPSC अंतर्गत 15 हजार जागा भरणार

loading image