esakal | IND vs ENG: विराट म्हणतो, "त्या घटनेनंतर संपूर्ण संघच नाराज"
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

IND vs ENG: विराट म्हणतो, "त्या घटनेनंतर संपूर्ण संघच नाराज"

sakal_logo
By
विराज भागवत

वाचा नक्की कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय विराट

Ind vs Eng 1st Test: टीम इंडिया आणि इंग्लंड (Ind vs Eng 1st Test) यांच्यातील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली खेळी केली. पण पावसाने (Rain Stopped Play) सामना अनिर्णित ठेवायला भाग पाडले. त्यामुळे दोनही संघांना कसोटी अजिंक्यपदाचे गुण वाटून देण्यात आले. दोन्ही संघांना २-२ गुण विभागून देण्यात आले पण त्यासोबत एका गोष्टीमुळे दोन्ही संघाचे २-२ गुण वजाही करण्यात आले. या मुद्द्यावरून संपूर्ण संघच नाराज असल्याचे विराट म्हणाला.

हेही वाचा: Video: ऋषभ पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे...

"कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही खूपच अटीतटीची असते हे आपण मागच्या वेळी पाहिलं आहे. त्यामुळे एक संघ म्हणून आम्ही सारेच दोन गुण गमवावे लागले या घटनेने नाराज आहोत. षटकांची गती कमी असल्याने आम्हाला दंड बसला आणि त्यासोबतच दोन गुणांचा फटका बसला. षटकांची गती योग्य राखणं ही आमची जबाबदारी आहे. आमच्या नियंत्रणात असलेली ही गोष्ट आहे. तरीही आम्हाला ते शक्य झालं नाही याची खंत आहे", असे विराटने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं.

हेही वाचा: IND vs ENG: विराट कोहली, जो रूट दोघांनाही बसला दंड; कारण...

"आम्ही षटकांची गती वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर आम्ही दोन षटकांनी मूळ खेळापेक्षा मागे पडलो. खरं पाहता आम्हाला खेळाच्या गतीसोबत समतोल राखायला हवा होता. ते आम्हाला जमलं नाही. त्याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ. कारण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एक एक गुण अतिशय महत्त्वाचा असतो. अशा वेळी जर अशा छोट्या चुकांमुळे गुण गमावले तर त्याचा एकत्रित मोठा फटका बसण्याची शक्यता आहे", असेही विराटने स्पष्ट केले.

हेही वाचा: IND vs ENG: विराट, रूटला आधी दंड अन् त्यातच बसला आणखी एक दणका

कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ या स्पर्धेत पहिलाच सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी २ गुण मिळाले, पण चार दिवसांचा जो खेळ झाला त्यात या दोन्ही संघांनी षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी या दोघांनाही दंड ठोठवण्यात आला. दोन्ही संघांना सामन्याच्या मानधनापैकी ४० टक्के मानधन दंड म्हणून भरण्याचे आदेश सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दिले. त्यासोबतच दोन्ही संघांचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील २-२ गुण वजा करण्यात आले.

loading image
go to top