IND vs NZ: पहिल्या टी-20 सामनापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला, 'मी धोनीसारखा...'

ind vs nz 1st 20 mitchell santner ms dhoni
ind vs nz 1st 20 mitchell santner ms dhoni

India vs New Zealand 1st T-20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-20 सामना रांची येथे रंगणार आहे. पाहुण्यांसाठी टी-20 चे आव्हानही सोपे नाही कारण भारतीय संघ टी-20 क्रिकेटमध्येही बलाढ्य आहे. संघात रोहित-विराटसारखे दिग्गज नसले तरी या संघातील युवा खेळाडूही तगडे आहेत.

ind vs nz 1st 20 mitchell santner ms dhoni
IND vs AUS: जडेजाची झंझावाती कामगिरी! कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला फुटला घाम

त्याशिवाय, भारताने एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला आणि हा आत्मविश्वास पांड्या आणि कंपनीलाही उपयोगी पडेल. मात्र, टी-20 मालिकेपूर्वी किवी कर्णधार मिचेल सँटनरने एकच गोष्ट सांगितली आहे की, तो धोनीसारखा आहे.

खरं तर, टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी मिचेल सँटनरने स्पष्ट केले की, त्याला भारतात खेळण्याचा अनुभव आहे. तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो आणि धोनीसोबत घालवलेला वेळ नक्कीच उपयोगी पडेल.

ind vs nz 1st 20 mitchell santner ms dhoni
Sania Mirza: 'मी इथे...' ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलच्या पराभवानंतर सानिया मिर्झा रडली, पाहा व्हिडिओ

सामन्याआधी मिचेल सँटनर म्हणाला की, 'धोनी आणि फ्लेमिंग दोघेही खूप शांत आहेत आणि मीही त्याच प्रकारचा आहे. त्याच्यासोबत खेळण्याचा अनुभव खूप चांगला होता. फ्लेमिंगमध्येही तेवढीच शांतता आहे आणि आम्ही या संघातही असेच वातावरण निर्माण केले आहे. यावर्षी एकदिवसीय विश्वचषक असल्याने त्या फॉरमॅटला प्राधान्य दिले जात आहे, पण देशासाठी प्रत्येक सामना खेळणे ही अभिमानाची बाब आहे.

ind vs nz 1st 20 mitchell santner ms dhoni
IND vs NZ: ODI धूळ चारल्यानंतर आता बारी टी-20 ची! मॅच फ्री कशी पाहाल? जाणून घ्या...

सँटनर संघातील सर्वोत्कृष्ट T20 खेळाडू

मिचेल सँटनरकडे सर्वोत्तम टी-20 क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. ग्लेन फिलिप्स, डेव्हॉन कॉनवे, फिन ऍलन, लोकी फर्ग्युसन सारखे खेळाडू स्वबळावर सामने जिंकू शकतात. पण टीम इंडियाला त्याच्या घरच्या मैदानावर हरवणे तितके सोपे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com