
Ravindra Jadeja IND vs AUS Series : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने दुखापतीनंतर दमदार पुनरागमन केले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे जडेजा जवळपास पाच महिने भारतीय संघाबाहेर होता. मात्र आता तो बरा होऊन परतला असून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दणका दिला आहे.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा आधीच केली आहे. ज्यामध्ये जडेजाचाही समावेश करण्यात आला आहे. पण जडेजाने या मालिकेपूर्वी रणजी सामने खेळणे पसंत केले, जेणेकरून त्याला जुना फॉर्म परत मिळावा.
सौराष्ट्रकडून खेळताना जडेजाने तामिळनाडूविरुद्ध चमकदार कामगिरी करून आपले कौशल्य दाखवून दिले. फिरकी अष्टपैलू जडेजा सौराष्ट्र संघाचा कर्णधार आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने एक विकेट घेतली, मात्र दुसऱ्या डावात 53 धावांत 7 विकेट घेतल्या. अशा स्थितीत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाला घाम फुटला आहे.
रणजी सामन्याच्या पहिल्या डावात जडेजाने 15 धावा केल्या. या सामन्यात सौराष्ट्र संघाला 266 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून संघाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 1 गडी गमावून 4 धावा केल्या. आता शेवटच्या दिवशी 262 धावांची गरज असून दुसऱ्या डावात जडेजाची फलंदाजी अजून यायची आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून), मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (कसोटी मालिकेचे वेळापत्रक):
पहिली कसोटी - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी - 17 ते 21फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.