IND vs NZ: ...अन् खूप उशीर झाला; टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार पांड्याचं धक्कादायक विधान!

India vs New Zealand 2nd T20
India vs New Zealand 2nd T20sakal

India vs New Zealand 2nd T20: टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना लखनौ येथील श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या कमी धावसंख्येच्या सामन्यात टीम इंडियाने 1 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

India vs New Zealand 2nd T20
IND vs NZ 2nd T20: भारताने न्यूझीलंडचा 6 विकेट्स केला पराभव! मालिका 1-1 अशी बरोबरीत

न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, 'मला नेहमीच विश्वास होता की आम्ही खेळ पूर्ण करू शकू, पण खूप उशीर झाला होता. या सर्व गोष्टी खेळाच्या क्षणी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही, कारण दबाव घेण्याऐवजी स्ट्राइक फिरवण्याबद्दल होता. आम्ही नेमके तेच केले.

लखनौच्या खेळपट्टीबद्दल बोलताना पांड्या म्हणाला, 'खरं सांगायचं तर ते धक्कादायक होतं. दोन सामने आम्ही ज्या प्रकारच्या विकेट्सवर खेळलो, मला कठीण विकेट्सची काहीच हरकत नाही, त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. पण या दोन्ही विकेट टी-20 साठी बनवलेल्या नाहीत. याशिवाय येथील 120 धावाही सामना जिंकण्यासाठी पुरेशा होत्या.

India vs New Zealand 2nd T20
IND vs NZ: १०० धावांसाठीही टीम इंडियाची उडाली भंबेरी! एक चेंडू शिल्लक असताना भारताचा विजय

दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 99 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने 2 तर दीपक हुडा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी 1-1 विकेट घेतल्या. टीम इंडियाने 1 चेंडू शिल्लक असताना 100 धावांचे लक्ष्य गाठले. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 26 आणि कर्णधार हार्दिक पंड्याने नाबाद 15 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com