IND vs NZ: १०० धावांसाठीही टीम इंडियाची उडाली भंबेरी! एक चेंडू शिल्लक असताना भारताचा विजय

India beat New Zealand by 6 wickets
India beat New Zealand by 6 wickets

India vs New Zealand 2nd T20 : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. भारताविरुद्ध टी-20 मध्‍ये किवी संघाची ही सर्वात कमी धावसंख्या होती. प्रत्युत्तरात टीम इंडियाने एक चेंडू बाकी असताना चार गडी गमावून लक्ष्य गाठले.

सूर्यकुमार यादवने भारतीय डावातील 20व्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला. या विजयासह तीन सामन्यांच्या T20I मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. निर्णायक सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

India beat New Zealand by 6 wickets
IND vs NZ 2nd T20: भारताने न्यूझीलंडचा 6 विकेट्स केला पराभव! मालिका 1-1 अशी बरोबरीत

भारताकडून शुभमन गिल आणि ईशान किशन सलामीला आले. यादरम्यान शुभमन 11 धावा करून बाद झाला. त्याने 9 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार मारले. इशान किशनने 32 चेंडूत 19 धावा केल्या. इशाननेही 2 चौकार मारले. राहुल त्रिपाठी 18 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला. त्याने 9 चेंडूंचा सामना करत 10 धावा केल्या.

भारताकडून सर्वात मोठी भागीदारी सूर्यकुमार आणि हार्दिक यांच्यात झाली. दोघांनी 30 धावांची नाबाद भागीदारी केली. या सामन्यात दोन्ही संघांनी एकही षटकार मारला नाही. दोन्ही डावात एकही षटकार न मारता एकूण 239 चेंडू टाकले. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हा उच्चांक आहे. यापूर्वी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात 2021 मध्ये मीरपूरमध्ये 238 चेंडू षटकार न टाकता टाकण्यात आले होते.

India beat New Zealand by 6 wickets
Shafali Verma: "...म्हणून हे शक्य झालं" इतिहास घडवणाऱ्या कप्तान शेफाली रडली

तत्पूर्वी, किवी संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. भारतीय फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडचे फलंदाज हतबल दिसले. भारताच्या फिरकीपटूंनी एकूण चार विकेट घेतल्या. फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही भारतासाठी विकेटचे खाते उघडले. त्याने फिन ऍलनला क्लीन बोल्ड केले. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने डेव्हॉन कॉनवेला झेलबाद केले. दीपक हुड्डाने ग्लेन फिलिप्सला बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. यानंतर कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला क्लीन बोल्ड केले.

अर्शदीपने 18व्या षटकात दोन विकेट घेतल्या. कर्णधार मिचेल सँटनर 19 धावांवर नाबाद राहिला आणि जेकब डफीने सहा धावा केल्या. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर चहल, कुलदीप, हुड्डा, सुंदर आणि हार्दिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com