रोहितसोबत कोण ते ओळखलंत? सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricketer
रोहितसोबत कोण ते ओळखलंत? सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

रोहितसोबत कोण ते ओळखलंत? सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यातील विजय रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी खास असाच आहे. नियमित कर्णधारपदी नियुक्त झाल्यानंतरचा रोहितसाठी हा पहिला सामना होता. तर द्रविडच्या नव्या इनिंगची सुरुवातही विजयाने झालीये.

दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघाचा युवा गोलंदाज दीपक चाहरने एक खास फोटो शेअर केलाय. कॅप्टन रोहित शर्मासोबतचा त्याचा जुना फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चाहरने सध्याच्या फोटो आणि जुना फोटो याचा कोलाज करुन जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. हा फोटो दोघांच्या 15 वर्षांच्या क्रिकेट प्रवासाची कहाणी सांगणारा आहे. दीपक चाहरने जो फोटो शअर केलाय.

हेही वाचा: "तुझी बॅटिंग जरी चांगली असली तरीही..."; गंभीरचं रोखठोक विधान

या फोटोमध्ये जो जुना फोटो आणि सध्याचा फोटो यातील कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे सवाई जयपूरचे सवाई सिंह स्टेडियम. 150 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा याच मैदानात एकत्र खेळली. चाहरने हा फोटो शेअर करताना एक खास कॅप्शन दिलंय. त्याने लिहिलंय की, 15 वर्षांपूर्वीची याच मैदानातील फोटो. त्यावेळी आपल्या दोघांनाही दाढी नव्हती. तो क्षण अविस्मरणीय असा होता.

हेही वाचा: "आपलं नातं क्रिकेट पलिकडलं"; विराटची ABD साठी भावनिक प्रतिक्रिया

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 36 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 48 धावा केल्या होत्या. त्याचे अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले होते. दुसरीकडे दीपक चाहर सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. त्याने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 42 धावा खर्च करुन एकमेव विकेट घेतली होती.

loading image
go to top