
Pakistan Team
ESakal
दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप सुपर-४ सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा फलंदाज हुसेन तलतने फलंदाजी करताना आयसीसीचा एक मोठा नियम मोडला. ११ व्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वरुण आणि यष्टीरक्षक संजू सॅमसनने एलबीडब्ल्यूसाठी अपील केले. पण त्याच क्षणी पाकिस्तानी खेळाडूने मोठी चूक केली.