esakal | T20 World Cup: पाकिस्तानविरूद्ध 'ही' टीम उतरवा; गंभीरचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India

गंभीरने आपल्या संघात एका स्टार खेळाडूला संधी नाकारलीय

T20 World Cup: पाकिस्तानविरूद्ध 'ही' टीम उतरवा; गंभीरचा सल्ला

sakal_logo
By
विराज भागवत

T20 World Cup 2021: भारतीय संघाचे खेळाडू सध्या युएईमध्ये दाखल झाले असून सहा दिवसांच्या सक्तीच्या क्वारंटाइनमध्ये आहेत. १९ सप्टेंबरपासून IPL 2021 स्पर्धा सुरू होणार आहे. ती स्पर्धा संपल्यानंतर लगेचच टी२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आधी पात्रता फेरीचे सामने होणार आहेत. त्यानंतर पात्रता फेरीतील सर्वोत्तम चार संघ मूळ स्पर्धेत इतर संघांशी दोन गटात खेळतील. भारताचा टी२० विश्वचषक स्पर्धेत सलामीचा सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी कोणते ११ खेळाडू भारताने उतरावावेत, याबद्दलचा सल्ला माजी फलंदाज गौतम गंभीरने दिला.

हेही वाचा: T20 World Cup: 'त्या' फलंदाजाला वगळल्याने माजी क्रिकेटपटू नाराज

गौतम गंभीरने आपल्या संघात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांना संधी दिली आहे. या दोन सलामीवीरांसोबतच विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या तिघांना मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय, अष्टपैलू खेळाडू असलेल्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा दोघांनाही त्याने संघात समाविष्ट करण्यात आलंय. तर गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर सोपवण्याचा सल्ला गंभीरने दिला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून गौतम गंभीरने रविचंद्रन अश्विन किंवा राहुल चहर याचा विचार केलेला नाही. गंभीरने आपल्या संघात वरूण चक्रवर्तीला पसंती दर्शवली आहे. दरम्यान, वरूण चक्रवर्ती हा अद्याप विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेला नाही.

Gautam Gambhir

Gautam Gambhir

हेही वाचा: "फालतू गप्पा नकोत, T20 World Cup कडे लक्ष द्या"; BCCIची ताकीद

गौतम गंभीरने निवडलेला संघ

फलंदाज- रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव

यष्टीरक्षक- ऋषभ पंत

अष्टपैलू- हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा

गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

loading image
go to top