Irfan Pathan & Robin Uthappa Recall 2007 T20 World Cup
esakal
On this day in 2007, India defeated Pakistan to win the first-ever T20 World Cup : १८ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे आजचा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खास आहे. भारतीय खेळाडूंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या सुरु असलेल्या आशिया कपमध्ये भारताने दोनदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्या त्यानंतर आता इरफान पठाण आणि रॉबीन उथप्पा यांनी या आठणीचे फोटो शेअर करत एकप्रकारे पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.