IND vs PAK WC 2023 : पाकचा अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार! BCCIवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न कायम

IND vs PAK WC 2023
IND vs PAK WC 2023sakal

IND vs PAK WC 2023 - आशिया कपचे यजमानपद आपल्या हातून जाणार आणि सर्व घडामोडीत बीसीसीआयने आपल्याला एकटे पाडल्याची भावना तयार झालेले पाकिस्तान क्रिकेट मंडळ बीसीसीआयवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही.

IND vs PAK WC 2023
Mumbai : मुलींच्या वसतिगृहांच्या पाहणीसाठी समिती - चंद्रकांत पाटील

पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्याशिवाय आम्ही कोणताही सामना अहमदाबादमध्ये खेळणार नाही, असे पाक मंडळाचे कार्याध्यक्ष नजम सेठी यांनी आयसीसीचे कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले यांना कळवले आहे.

पाकमध्ये नियोजित असलेल्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ आमच्या देशात आला नाही तर भारतातील विश्वकरंडक स्पर्धेत आम्ही खेळणार नाही, असे तुणतुणे पाककडून सुरुवातीला वाजवले जात होते; परंतु आयसीसीने इशारा दिल्यानंतर या स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार त्यांनी बाजूला टाकला.

IND vs PAK WC 2023
Pune : विधी क्षेत्रातील अमर्याद संधींचे दालन ‘सकाळ लॉ सिंपोजियम’

आता अहमदाबादमध्ये आमचे साखळी सामने आयोजित केले तर ते आम्ही खेळणार नाही. कोलकता, चेन्नई आणि बंगळूरमध्ये हे सामने खेळू, असे त्यांनी आयसीसीला सुचवले असल्याचे समजते.

बार्कले आणि आयसीसीचे सरव्यवस्थापक जेफ अलार्डिस यांनी कराचीत जाऊन नजम सेठी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती आणि विश्वकरंडक स्पर्धेसंदर्भात पाकची भूमिका जाणून घेतली होती.

IND vs PAK WC 2023
Mumbai : मुलींच्या वसतिगृहांच्या पाहणीसाठी समिती - चंद्रकांत पाटील

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आम्ही कोणतेही आमचे साखळी सामने खेळणार नाही, आमचे सामने बंगळूर, चेन्नई किंवा कोलकता येथे आयोजित करा, असे सेठी यांनी आयसीसीच्या या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे पाक मंडळाच्या पदाधिकाऱ्याने कळवले. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.आशिया कप संदर्भात आमचे हायब्रीड मॉडेल बीसीसीआयला मान्य करायला लावा, असेही सेठी यांनी आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com