

India and South Africa Series
ESakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मोठी क्रिकेट लढाई आता काही दिवसांवर आली आहे. १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. ही मालिका दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांच्या दीर्घ मालिकेची सुरुवात असेल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी (WTC) देखील महत्त्वाची मानली जाते, कारण दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये आहेत.