Sanju Samson : रोहित-विराट समोर येताच संजुच्या चाहत्यांनी केली नारेबाजी - VIDEO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanju Samson suryakumar yadav video cricket

Sanju Samson : रोहित-विराट समोर येताच संजुच्या चाहत्यांनी केली नारेबाजी - VIDEO

Sanju Samson Ind vs Sa : विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 मालिका खेळायची आहे. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. पहिला सामना बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. टीम इंडिया हैदराबादहून तिरुअनंतपुरमला पोहोचली तेव्हा त्याचे विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले. संघात निवड न झालेल्या संजू सॅमसनच्या बाजूने खेळाडूंसमोर घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा: ICC T20 Ranking : पाकिस्तानच्या विजयाचा भारताला फायदा; टी-20 क्रमवारीत वर्चस्व कायम

टीम इंडिया विमानतळावरून बाहेर पडत असताना चाहते संजू-संजूच्या घोषणा देत होते. विराट कोहली, केएल राहुल, युझवेंद्र चहल आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह सर्व खेळाडूंसमोर या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान सूर्यकुमार चाहत्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतो. त्याने बसच्या आतून मोबाईलमधील संजू सॅमसनचा फोटो दाखवला. हे पाहून चाहते खूश झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वीच टीम इंडियातून 3 खेळाडू बाहेर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार महिन्यांतील ही दुसरी टी-20 मालिका आहे. या वर्षी जूनमध्ये आफ्रिकन संघ पाच सामने खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली होती. एका सामन्यात निकाल लागला नाही. दोन्ही संघांमधील मागील दोन मालिका अनिर्णित राहिल्या हा योगायोग म्हणावा लागेल. या वर्षी जूनपूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये भारतातील तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत होती.

टी-20 मालिका -

  • पहिला टी-20 : 28 सप्टेंबर, तिरुवनंतपुरम, संध्याकाळी 7.30 वाजता

  • दुसरा T20: 2 ऑक्टोबर, गुवाहाटी, संध्याकाळी 7.30

  • तिसरा T20: 4 ऑक्टोबर, इंदूर, संध्याकाळी 7.30

एकदिवसीय मालिका -

  • पहिली वनडे : 6 ऑक्टोबर, लखनौ, दुपारी 1.30

  • दुसरी वनडे: 9 ऑक्टोबर, रांची, दुपारी 1.30 वाजता

  • तिसरी वनडे : 11 ऑक्टोबर, दिल्ली, दुपारी 1.30 वाजता