
Yuzvendra Chahal Towel Dance : रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा मालिका विजयाचा धडाका कायम आहे. धरमशाला मैदानात टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेला व्हाईट वॉश केल. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यासह भारताकडून श्रेय अय्यरनं दिमाखदार खेळ दाखवून संघातील स्थान भक्कम केले. सलग तिसऱ्या आणि नाबाद अर्धशतकासह श्रेयस अय्यरनं (नाबाद 73) भारतीय संघाला तिसरा सामना जिंकून दिला. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकाचा कर्णधार दासुन शनाकानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. आघाडी कोलमडल्यानंतर 38 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी करत त्याने संघाच्या धावफलकावर 146 धावा लावल्या. टीम इंडियाने ह आव्हान सहज पार केले. युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतानाही तो चर्चेत आला आहे.
तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघ चार बदलासह मैदानात उतरला होता. ईशान किशनला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि बुमराह यांना विश्रांती देण्यात आली होती. मॅच दरम्यान युजवेंद्र चहलडग आउटमध्ये धमाल करताना दिसला. प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतानाही युजवेंद्र चहल चर्चेत आला आहे. भारतीय संघाच्या डावात चहल डगआउटमध्ये सावरिया... स्टाइल टॉवेल डान्स करत संघाला चीअर करताना दिसले. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला चांगली पसंती मिळत असून व्हिडिओवर कमेंट्सची बरसातही होताना दिसते.
श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीनं भारताच्या डावाला सुरुवात केली. भारतीय संघाच्या धावफलकावर 6 धावा असताना कॅमेरा डगआउटकडे फिरला. यावेळी युजवेंद्र चहल डान्स करतानाचा सीन कॅमेऱ्यात कैद झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.