टी-20 मालिकेसाठी ऋतुराजसह दीपक हुड्डा टीम इंडियात

Ruturaj Gaikwad
Ruturaj GaikwadInstagram

India vs West Indies T20 series : वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी ऋतूराज गायकवाड आणि दीपक हुड्डा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. लोकेश राहुल आणि अक्षर पटेल हे स्पर्धेतून आउट झाल्यानंतर या दोघांच्या जागा भरण्यासाठी ऋतूराज गायकवाड आणि दीपक हुड्डा भारतीय संघाला जॉईन होतील. ही दोघही वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचा भाग होती. (Ruturaj Gaikwad added into the Indian T20 team for the West Indies series)

दीपक हुड्डाने वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातून वनडे पदार्पण केले. दुसरीकडे कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ऋतूराज गायकवाडला वनडे मालिकेला मुकावे लागले होते. आता त्याला टी-20 सामन्यात संधी मिळाली असून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com