

India Bangladesh Series
esakal
ढाका: भारत-बांगलादेश यांच्यामधील क्रिकेट मालिकेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे प्रमुख तमिम इक्बाल यांच्याकडून याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून या मोसमातील वेळापत्रक पुन्हा एकदा तयार करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक नुकसान झालेली बांगलादेश प्रीमियर लीगही या मोसमात होणार नाही.