India Football Team : सॅफ विजेतेपदानंतर फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ १००च्या आत

India Football Update : सॅफ विजेतेपदानंतर फिफा क्रमवारीत प्रगती
India Football Team
India Football Teamsakal

New Delhi News : सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय फुटबॉल संघाने आणखी एक लौकिक मिळवला आहे. सॅफ स्पर्धेतील अजिंक्यपदानंतर फिफा क्रमवारीत ९९व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.

लेबनॉननेही दोन गुणांची प्रगती केली; परंतु ते भारतापेक्षा एक स्थान पाठीमागे आहेत. फिफा स्पर्धेतील कामगिरीमुळे कुवेतच्याही स्थानात सुधारणा होऊन ते १३७ व्या क्रमांकावर पोहचले आहेत. सॅफ स्पर्धेचा स्पर्धात्मक दर्जा वाढावण्यासाठी लेबनॉन आणि कुवेत या पश्चिम आशियाई देशांच्या संघांना खेळवण्यात आले होते.

India Football Team
Sports News : रिक्षा चालकाच्या मुलीची सुवर्ण कामगिरी; स्विमींगमध्ये देशाला मिळवून दिलं 'गोल्ड'

९९ व्या स्थानावर प्रगती करणाऱ्या भारताचे १२०८.६९ गुण झाले आहेत. १९९६ मध्ये भारताने या रँकिंगमध्ये ९४ व्या स्थानापर्यंत मजल मारली होती. १९९३ मध्येही ९९ व्या क्रमांक मिळवला होता. त्यानंतर २०१७ आणि २०१८ मध्ये ९६ वा क्रमांक होता. गेल्या महिन्यापर्यंत भारतीय संघ १०० व्या स्थानावर होता.

India Football Team
Football: मेस्सीच्या टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा गोलकीपर म्हणाला, 'भारतात येण्याचं माझं स्वप्न...'

अर्जेंटिना अव्वल स्थानावर

विश्वविजेत्या अर्जेंटिनाने फिफा क्रमवारीतील पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर फ्रान्स, ब्राझील, इंग्लंड आणि बेल्जियम अशी क्रमवारी आहे. आशिया देशांत जपान २०, त्यानंतर इराण (२२), ऑस्ट्रेलिया (२७), कोरिया (२८) आणि सौदी अरेबिया (५४) असे आशियातील टॉप फाईव्ह देश आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com