India medal tally Commonwealth Games 2026 today
esakal
India Medal Tally CWG 2026: Gen Z Stars Shine : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतासाठी आणखी एक यशस्वी दिवस ठरला. युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत 'Gen Z' ची ताकद दाखवून दिली. ज्युदोमध्ये भारताने दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी तीन ऐतिहासिक पदके जिंकली, तर अॅथलेटिक्समध्ये नीरज चोप्राने रौप्य आणि यश वीर सिंहने कांस्यपदक पटकावले. तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये कांस्य जिंकत भारताच्या पदकसंख्येत आणखी भर घातली. त्यात भारताच्या १० बॉक्सर्सनी आपापल्या गटाची फायनल गाठून शनिवारी १० सुवर्णपदकांची आशा निर्माण केली आहे.