

India Men's Badminton
esakal
इचिनोमिया (जपान) : भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक प्रकारात बांगलादेशचा ३-० असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघासमोर जपानचे आव्हान असणार आहे.
लक्ष्य सेन-आयबीएन अयमान जमान यांच्यामधील लढत एकतर्फी झाली. लक्ष्य सेन याने २१-४, २१-१२ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. त्यानंतर आयुष शेट्टी याने गौराब सिंग याला २१-४, २१-१३ असे अवघ्या २५ मिनिटांमध्ये नमवले.
किदांबी श्रीकांत याने जुमार अल अमिन याच्यावर २१-१५, २१-९ अशी मात केली. किदांबी श्रीकांत याने २३ मिनिटांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय साकारला.
भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने सलामीच्या लढतीत कझाकस्तानवर ३-० असा धडाकेबाज विजय मिळवला. भारतीय महिला बॅडमिंटन संघासमोरही जपानचे आव्हान असणार आहे. भारताच्या दोन्ही संघांच्या उपांत्यपूर्व लढती जपानविरुद्धच होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.