India Badminton Team : बॅडमिंटनमध्ये चीनचा अडथळा कायम ; आशियाई क्रीडा स्पर्धा : भारतीय पुरुष संघाला ब्राँझवरच समाधान

Indian Men's Badminton Team Settles for Bronze : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीने एकमेव विजय मिळवला, त्यामुळे भारतीय संघाला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
India Badminton Team

India Badminton Team

esakal

Updated on

नागोया : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्येही चीनचे चक्रव्यूह भेदता आले नाही. २०२२मधील हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये चीनकडून हार पत्करावी लागल्यामुळे भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात चीनकडूनच उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला ब्राँझपदकावरच समाधान मानावे लागले.

भारत-चीन यांच्यामधील उपांत्य फेरीच्या लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. लक्ष्य सेन-शू युकी यांच्यामधील पुरुष एकेरीच्या लढतीने या फेरीला सुरुवात झाली. मात्र शी युकीने निर्णायक क्षणी केलेल्या शानदार खेळामुळे लक्ष्य सेन याचा पराभव झाला. चीनच्या खेळाडूने पहिला गेम २१-१६ असा जिंकत १-० अशी आघाडी घेतली. शी युकी याने दुसऱ्या गेममध्ये २१-१८ अशी बाजी मारत चीनला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

India Badminton Team
Marathwada Yellow Alert : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाच्या सरी ; ठिकठिकाणी हजेरी; उन्हाच्या झळा, उकाड्यापासून काहीसा दिलासा

आयुषचा पराभव

आयुष शेट्टी यालाही एकेरीच्या लढतीत सूर गवसला नाही. त्याला ली शिफेंग याचे आव्हान परतवून लावता आले नाही. आयुष शेट्टी-ली शिफेंग यांच्यामधील पहिला गेम चुरशीचा झाला. आयुष शेट्टी याला पहिल्या गेममध्ये दबावाखाली आपला खेळ उंचावता आला नाही. अखेर १९-२१ अशी हार त्याला सहन करावी लागली. पुढील गेममध्ये ली शिफेंग याने २१-१३ असे यश मिळवले.

दुहेरीत हार

दुहेरीत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही यश मिळाले नाही. ही जी टिंग-लिऊ यी या चीनच्या जोडीने अम्साकरूनन हरीहरण-एम. आर. अर्जुन या भारतीय जोडीवर २१-१६, १७-२१, २१-९ असा विजय साकारला आणि चीनच्या ३-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.

India Badminton Team
Gold Rate Today: शेअर बाजारानंतर सोन्याचे भावही घसरले! दसऱ्याआधी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; पाहा ताजा भाव

सात्त्विक-चिराग जोडीचा विजय

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाकडून सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने एकमेव विजय नोंदवला. लियांग वेईकेंग -वँग चँग या चीनच्या जोडीचे कडवे आव्हान भारतीय जोडीने २१-११, २२-२० असे परतवून लावले; मात्र भारताच्या इतर खेळाडूंकडून निराशा झाल्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अखेर ब्राँझपदकावरच समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com