
IND vs NZ : भारताकडून तिघांना तर किवींकडून दोघांना विक्रमाची संधी
मुंबई : भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना (Test match) शुक्रवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणार आहे. या सामन्यात अनेक मोठे विक्रम होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर आर अश्विनला न्यूझीलंडचा महान गोलंदाज रिचर्ड हॅडलीला मागे टाकण्याची संधी असेल, तर केन विल्यमसन आणि रॉस टेलर माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमची बरोबरी करू शकतात. याशिवाय टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला मागे टाकण्याची संधी असेल.
अश्विनला आठ विकेट्सची गरज आहे
अश्विनने (Ravichandran Ashwin) न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ५८ बळी घेतले आहेत. मुंबई कसोटीत त्याने आणखी आठ विकेट घेतल्यास खात्यात एकूण ६६ विकेट्स होतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम सध्या रिचर्ड हॅडलीच्या नावावर आहे. हेडलीने भारताविरुद्धच्या १४ कसोटी सामन्यांमध्ये ६५ बळी घेतले आहेत.
हेही वाचा: ओमिक्रॉनचा प्रभाव : सरकारने १५ डिसेंबरची डेटलाईन पुढे ढकलली
रहाणेकडे धोनीला मागे टाकण्याची संधी
अजिंक्य रहाणेने (ajinkya rahane) आतापर्यंत ४७९५ कसोटी धावा काढल्या आहेत. त्याने मुंबई कसोटीत आणखी ८१ धावा केल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी धावा करण्याच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनीला मागे टाकेल. धोनीच्या खात्यात ४८७६ धावा आहेत. रहाणेला घरच्या मैदानावर फॉर्ममध्ये परतण्याची मोठी संधी असेल.
केन आणि रॉस मॅकलमच्या क्लबमध्ये सामील होतील का?
किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसन आणि वरिष्ठ फलंदाज रॉस टेलर यांनाही विशेष विक्रम करण्याची संधी असेल. विल्यमसनने १२९ आणि टेलरने ११७ धावा काढल्या तर भारताविरुद्धच्या कसोटीत १,००० धावा काढणारे खेळाडू होतील. असे करून ते ब्रेंडन मॅकलमच्या क्लबमध्ये सामील होतील. भारताविरुद्ध न्यूझीलंडकडून मॅकलमने १,२२४ धावा काढल्या आहेत.
हेही वाचा: ‘या’ देशांना भेट दिल्यास तुम्हाला वाटेल श्रीमंत झाल्यासारखं
इशांत झहीरला मागे टाकेल का?
इशांत शर्माला मुंबई कसोटीत झहीर खानला मागे टाकण्याची संधी आहे. भारतासाठी दोघांनी एकूण प्रत्येकी ३११ विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत दोघेही पाचव्या क्रमांकावर आहेत. इशांत विकेट घेताच झहीरच्या पुढे जाईल.
Web Title: India New Zealand Test Match Wankhede Stadium Ravichandran Ashwin Ajinkya Rahane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..