India Open 2022 : पीव्ही सिंधूचा खेळ खल्लास!

File photo of PV Sindhu
File photo of PV SindhuFile Photo

ऑलिम्पिक मेडलिस्ट पीव्ही सिंधूचा India Open 2022 स्पर्धेतील प्रवास सेमी फायनलमध्येच संपुष्टात आला. थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपानिदा कातेथोंग (Supanida Katethong) हिने पीव्ही सिंधूला (PV Sindhu) 14-21, 21-13, 10-21 असे पराभूत केले. महिला एकेरी गटात सिंधूनं (PV Sindhu ) भारतीय अश्मिता चलिहा हिला 21-7, 21-18 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत सेमी गाठली होती. (India Open 2022 PV Sindhu out after losing the semi final clash against Thailands Supanida Katethong)

सेमी फायनल लढतीत सिंधूची सुरुवातच अडखळत झाली. तिने पहिला सेट 14-21 असा गमावला. अनुभवाच्या जोरावर 26 वर्षीय पीव्ही सिंधून कमबॅक केले. दुसरा सेट तिने 21-13 असा जिंकून सामन्यात पुन्हा रंगत आणली. पण निर्णायक सेटमध्ये ती पुन्हा मागे पडली आणि 10-21 अशा पराभवासह तिच्यावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली.

File photo of PV Sindhu
कोहलीनं ड्रेसिंगरुममध्येच फोडला होता कॅप्टन्सी सोडण्याचा बॉम्ब

स्पर्धेतील अंतिम सामन्यात आता थायलंडची सुपानिदा हिच्यासमोर आपल्याच देशाची आणि स्पर्धेतील दुसऱ्या मानांकित बुसानन ओंग्बारुंगफान हिचे आव्हान असेल. बुसानन हिने भारताच्या आकर्षी कश्यपला 26-24, 21-9 असे पराभूत करत फायनल गाठलीये.

File photo of PV Sindhu
कॅप्टन्सीत खऱ्या अर्थानं किंग ठरलाय कोहली, पाहा रेकॉर्ड

पुरुष गटातील दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये भारताची दुसरी मानांकित सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं फायनल गाठली आहे. या जोडीनं फ्रान्सच्या विलियम आणि फेबियन जोडीला 21-9, 23-21 असे पराभूत करत स्पर्धेची फायनल गाठली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com