Boycott Demands Reach Indian Team
esakal
क्रीडा
India vs Pakistan Asia Cup 2025 : पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा की नाही, भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये चर्चा? नेमकं काय घडतंय?
Boycott Demands Reach Indian Team : भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी पुढे येते आहे. याविरोधात आज ठाकरे गटाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलनही करण्यात येणार आहे. तसेच सौरव गांगुली आणि केदार जाधव या माजी क्रिकेटपटूंनी हा खेळू नये, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
India vs Pakistan Asia Cup 2025 Dressing Room Discussion : आशिया चषकात आज भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र, या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी पुढे येते आहे. याविरोधात आज ठाकरे गटाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलनही करण्यात येणार आहे. इतकच नाही, सौरव गांगुली आणि केदार जाधव यासारख्या माजी क्रिकेटपटूंनी हा खेळू नये, अशी इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे म्हणजे हा विषय भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.