esakal | भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; दहा विकेट राखून विजय
sakal

बोलून बातमी शोधा

INDIA THRASH PAKISTAN BY 10 WICKETS, STORM INTO FINAL
  • युवकांकडून पाक नेस्तनाबूत
  • मुंबईकर शतकवीर यशस्वीचा विजयी षटकार

भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; दहा विकेट राखून विजय

sakal_logo
By
वृत्तसेवा

पोत्शेस्त्रूम : भारतीय युवक संघाने विश्‍वकरंडक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. भारतीय युवकांनी स्पर्धा इतिहासातील पहिला दहा विकेटनी विजय मिळवण्याचा पराक्रम पाकिस्तानविरुद्ध केला आणि त्यातही मुंबईच्या यशस्वी जैसवालने त्याचे शतक आणि भारताचा विजय षटकाराने साध्य केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाणेफेक जिंकून तसेच हैदर अली आणि रोहैली नझीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली 62 धावांची भागीदारी सोडल्यास पाकिस्तानला कधीही प्रतिकारही करता आला नाही. त्यांचा प्रथम फलंदाजीच्या आनंदावर भारतीयांनी दुसऱ्या षटकात विकेट घेत विरजण टाकले. त्यातच भारताच्या प्रमुख गोलंदाजांना यश हैदर - नझिरीची सतरा षटके टिकलेली जोडी फोडता येत नाही हे पाहिल्यावर ही कामगिरी यशस्वीने पार पाडली आणि त्याला शतकापासून रोखण्यासाठी पाकिस्तानने केलेले प्रयत्नही पार अपयशी ठरले.

मुख्यमंत्र्यांना वाटते आपण शेतकऱ्यांचे तारणहार : राजू शेट्टी

खरेतर या सामन्यास लढत म्हणावे का हाच प्रश्‍न पडला आहे. तिसऱ्या विकेटची भागीदारी सोडल्यास पाकचा डाव क्वचितच सावरला. त्यांचा डाव 2 बाद 96 वरुन 172 धावात संपला. हैदर आणि नझीर सोडल्यास त्यांच्या एकाही फलंदाजास पावशतक करता आले नाही. या दोघांसह सहाव्या क्रमांकावरील हॅरिस यांनीच दोन आकडी धावा केल्या. त्यांचे अखेरचे सहा फलंदाज 26 धावांत परतले. भारताच्या अचूक गोलंदाजीस चपळ क्षेत्ररक्षणाचीही साथ लाभली. सक्‍सेनाने घेतलेला झेल जबरदस्त होता. पाकच्या तळाच्या फलंदाजांना भारताच्या मध्यमगती गोलंदाजीस कसे खेळावे हेच कळत नव्हते. कर्णधार रोहैल याला तर डावास स्थैर्य कसे द्यावे हेच कळत नव्हते, अखेर तोही दडपणाखाली बाद झाला.

काँग्रेसला धक्का; दिग्गज नेत्याच्या मुलानेच केला भाजपमध्ये प्रवेश

पाकिस्तानी गोलंदाजांनी क्वचितच भारतीय फलंदाजांचा कस पाहिला. यशस्वी जैसवालने आक्रमण सुरू केल्यावर दिव्यांश सक्‍सेनाने साथीदाराची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. यशस्वीने चौफेर फटकेबाजी सुरू केल्यावर पाकने सामना सोडून दिला होता आणि यशस्वीला विजयी औपचारीकता पूर्ण करण्यास प्रयास पडले नाहीत.

पाकिस्तान युवक ः 43.1 षटकांत 172 (हैदर अली 456 - 77 चेंडूंत 9 चौकार, रोहैल नझीर 62 - 102 चेंडूंत 6 चौकार, मोहम्मद हॅरीस 21 - 15 चेंडूंत 1 चौकार आणि 1 षटकार, कार्तिक त्यागी 8-0-32-2, सुशांत मिश्रा 8.1-0-28-3, रवी बिश्नोई 10-0-46-2, अथर्व अंकोलेकर 7-0-29-1, यशस्वी जैसवाल 3-0-11-1) पराजित वि. भारतीय युवक ः 35.2 षटकांत बिनबाद 176 (यशस्वी जैसवाल नाबाद 105 - 113 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकार, दिव्यांश सक्‍सेना नाबाद 59 - 99 चेंडूंत 6 चौकार)
सामनावीर ः यशस्वी जैसवाल

विश्‍वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य लढतीत शतक याचा असलेला आनंद शब्दांत व्यक्त करणेही अवघड आहे. लक्ष्य अवघड नव्हते, पण ते साध्य करण्यासाठी खेळपट्टीवर टिकाव धरून राहणे महत्त्वाचे होते. सुरुवातीच्या षटकात यशस्वी सामना केल्यानंतर आपण वर्चस्व राखू शकतो, याची खात्री पटली होती.
- यशस्वी जैसवाल

भारतीय संघाने जबरदस्त खेळ केला. त्यांची फलंदाजी अविश्‍वसनीय होती. त्यांनी सुरेख झेल घेतले, तसेच आमची जोडी जमली असे वाटत असतानाच ती फोडलीही. हैदर मोक्‍याच्यावेळी बाद झाल्याने आम्हाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.
- रोहेल नझीर, पाकिस्तान कर्णधार

भारताचा दबदबा
- भारत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत
- भारत एकंदर चार वेळा विजेता
- भारताचा विश्‍वकरंडक स्पर्धेतील सलग अकराव्या सामन्यात एकतर्फी विजय
- या कालावधीत धावांचा फरक सरासरी 107, तर विकेटच्या फरकाने विजय नऊ विकेटनी.
- भारताचा पाक युवकांविरुद्धचा विश्‍वकरंडकातील पाचवा विजय. आता दोघांचे एकमेकांविरुद्ध समान पाच विजय

loading image