IND vs AFG 1st T20 : कुठं पाहायचा भारत - अफगाणिस्तान टी 20 सामना; कधी अन् कुठं होणार लाईव्ह स्ट्रीमिंग?

IND vs AFG 1st T20 Free Live Streaming
IND vs AFG 1st T20 Free Live Streaming esakal

IND vs AFG 1st T20 Free Live Streaming : भारतीय संघ 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरूद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय टी 20 मालिका असणार आहे. पहिला सामना हा मोहालीत आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे.

भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानविरूद्ध खेळलेल्या टी 20 सामन्यात पराभव पाहिलेला नाही. मात्र अफगाणिस्तानचा संघ अत्यंत बेभवरशाचा आहे. त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये दोन तगड्या संघांना पराभवाची धूळ चारली होती.

IND vs AFG 1st T20 Free Live Streaming
Wasim Akarm : पत्नीला हॉट म्हणणाऱ्या चाहत्यावर वसिम अक्रम जाम भडकला; म्हणाला...

पहिला टी 20 सामना कधी सुरू होणार?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी 20 मालिकेतील पहिला सामना हा गुरूवारी 11 जानेवारीला होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक ही साडेसहा वाजता होणार आहे. अफगाणिस्तानचा संघ इब्राहिम जादरानच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

सामना कुठं पाहता येणार लाईव्ह?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी 20 मालिका ही कोठे लाईव्ह दिसणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. भारत आणि अफगाणिस्तान सामन्याचं टीव्हीवरून थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 वर होणार आहे. तर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग हे जिओ सिनेमावर होणार आहे.

जिओच्या मोबाईल अॅपवर मालिकेतील सर्व सामने हे मोफत लाईव्ह स्ट्रीम होणार आहेत. भारतात होणाऱ्या सर्व द्विपक्षीय मालिकांचे थेट प्रक्षेपण हे स्पोर्ट्स 18 वरून करण्यात येणार आहे.

IND vs AFG 1st T20 Free Live Streaming
Ind Vs Afg T20 : अफगाणिस्तानला मोठा धक्का! रशीद खान दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

भारताचा टी 20 संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तानचा टी 20 संघ :

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमनलुल्ला गुरबाद, इकराम अलिखिल, हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्ला जादरान, मोहम्मद नबी, कमीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब - उर - रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद समील, कैस अहमद, गुलबदीन नायब, राशिद खान.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com