Tilak Varma IND vs AUS : तिलक वर्मा टेन्शनमध्ये; वर्ल्डकपच्या संघबांधणीसाठी फक्त 9 सामने त्यात आता...

Tilak Varma IND vs AUS
Tilak Varma IND vs AUSEsakal

Tilak Varma T20 World Cup 2024 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकून आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी युवा टीम इंडिया सज्ज झाली आहे.

भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपली वर्ल्डकप संघासाठी दावेदारी सादर केली आहे. यशस्वी जैसवाल, इशान किशन आणि रिंकू सिंहने तर आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. मात्र तिलक वर्माला मोठी कामगिरी करण्यात अपयश आलं आहे.

Tilak Varma IND vs AUS
Virat Kohli : इंटरनेटवरही 'कोहली'च किंग! ठरला यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटर

तिलक वर्माला पुरेशी संधी मिळणार?

वनडे वर्ल्डकपनंतरची ही भारताची पहिलीच टी 20 मालिका असली तरी 2024 मध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिका इथे होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपूर्वी भारतीय संघाला फक्त 9 टी 20 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर संघाचा उपकर्णधार म्हणून परतणार आहे. तो परतल्यानंतर तिलक वर्माच्या (Tilak Varma) संघातील स्थानाला धोका निर्माण होणार आहे.

यशस्वी, ऋतुराज अन् रिंकूचा धमाका

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यात भारताच्या वरच्या फळीने दमदार कामगिरी केली आहे. यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड यांनी दुसऱ्या सामन्यात चांगली सुरूवात करून दिली. याचबरोबर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने देखील चांगली फटकेबाजी केली.

तर रिंकू सिंहने फिनिशिंग टच देत धोनीसारखं आपणही मोठा मॅच फिनिशनर होण्याची क्षमता ठेवतो हे दाखवून दिलं. त्याने सहाव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून वर्ल्डकप संघातील आपली जागा निश्चित करण्यासाठी दावेदारी सादर केली आहे.

Tilak Varma IND vs AUS
IND vs AUS 3rd T20I : भारत मालिका विजयासह इतिहास रचण्यासही सज्ज; सर्वात यशस्वी टी 20 संघ होण्याची संधी

दुसरीकडे तिलक वर्माने पहिल्या टी 20 सामन्यात 209 धावांचा पाठलाग करताना 10 चेंडूत 12 धावा केल्या. दुसऱ्या टी 20 सामन्यात रिंकू सिंहला त्याच्या वर फलंदाजीला पाठवण्यात आलं. त्यामुळे त्याला फक्त दोन चेंडू खेळण्याची संधी मिळाली. आता तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव तिलक वर्माला आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याची संधी देतो का हे पहावं लागेल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com