Suryakumar Yadav Leads Team India
esakal
India face Bangladesh in the Asia Cup 2025 Super Four clash : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या आशियाई क्रिकेट करंडकात सलग चार सामन्यांमध्ये विजय संपादन करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ‘सुपर फोर’ फेरीमधील पहिल्या लढतीत पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियाला बांगलादेशशी दोन हात करावयाचे आहेत. या लढतीत विजय मिळवल्यास भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे. याच कारणामुळे बांगलादेशविरुद्धची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे.