IND vs ENG T20WC22 : इंग्लंडचा 10 विकेट्स राखून विजय; भारताचे आव्हान संपुष्टात

India vs England  2nd Semi Final T20 World Cup 2022
India vs England 2nd Semi Final T20 World Cup 2022 esakal

India Vs England 2nd Semi Final T20 World Cup 2022 : इंग्लंडने भारताचा सेमी फायनलमध्ये तब्बल 10 विकेट्सनी पराभव करत वर्ल्डकपमधून पॅक अप केले. भारताने 169 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमावता पार केले. जॉस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. तर अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या.

भारताची धावसंख्या मंदावली असताना भारताचा कुंफू पांड्या हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी करत भारताला 20 षटकात 6 बाद 168 धावांपर्यंत पोहचवले. त्याने 32 चेंडूत 63 धावांची खेळी केली. याचबरोबर विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी करत हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माने 27 तर सूर्यकुमार यादवने 14 धावांचे योगदान दिले.

बटरल - हेल्सची शतकी सलामी

इंग्लंडची सलामी जोडी जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी नाबाद शतकी सलामी देत भारतापासून सामना दूर नेण्यास सुरूवात केली.

हेल्सचे दमदार अर्धशतक 

सावध सुरूवात करणाऱ्या अॅलेक्स हेल्सने 28 चेंडूत अर्धशतक ठोकत इंग्लंडला 8 षटकात 84 धावांपर्यंत पोहचवले.

ENG 63/0 (6) : इंग्लंडने पॉवर प्ले लावला सार्थकी

जोस बटलरनंतर इंग्लंडचा दुसरा सलामीवीर अॅलेक्स हेल्सने आक्रमक फटकेबाजी करत इंग्लंडला पॉवर प्लेमध्येच 63 धावांपर्यंत पोहचवले.

ENG 33/0 (3)  : इंग्लंडची आक्रमक सुरूवात

भारताचे विजयासाठीचे 169 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरूवात केली. जॉस बटलरने फटकेबाजी करत इंग्लंडला 3 षटकात बिनबाद 33 धावांपर्यंत पोहचवले.

168-6 (20 Ov) : हार्दिक पांड्या शेवटच्या चेडूवर हिट विकेट

हार्दिक पांड्याने 36 चेंडूत दमदार 63 धावांची खेळी केली मात्र तो शेवटच्या चेंडूवर हिटविकेट झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर चौकार मारून देखील भारताला 170 च्या पार जाता आले नाही.

हार्दिक पांड्याचे दमदार अर्धशतक 

विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने शेवटच्या दोन षटकात झुंजार फलंदाजी करत आपले अर्धशतक आणि संघाचे दीडशतक पूर्ण केले.

136-4 : अर्धशतकानंतर विराट झाला बाद 

विराट कोहलीने ख्रिस जॉर्डन टाकत असलेल्या 18 व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. मात्र जॉर्डनने पुढच्याच चेंडूवर विराटला बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी भागीदारी रचण्यावर भर दिला. यानंतर त्यांनी शेवटच्या 5 षटकात आक्रमक फलंदाजी करत भारताची धावगती वाढवण्यास सुरूवात केली. विराटने आपले वर्ल्डकपमधील चौथे अर्धशथक पूर्ण केले. हार्दिक पांड्याने देखील गिअर बदलला.

 75-3 : सूर्या बाद 

सूर्यकुमार यादवने काही आकर्षक फटके मारले. मात्र तो 10 चेंडूत 14 धावांची भर घालून परतला.

IND 62/2 (10) : विराट - सूर्या जोडीवर मदार

56-2 : ख्रिस जॉर्डनने दिला भारताला दुसरा धक्का

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी रचली. मात्र ख्रिस जॉर्डनने 28 चेंडूत 27 धावा करणाऱ्या रोहित शर्माला बाद करत ही जोडी फोडली.

IND 38/1 (6) : रोहित - विराटने धावगती वाढवली

केएल राहुल दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पॉवर प्लेमध्ये चांगली धावगती राखण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 6 च्या सरासरीने 38 धावा केल्या.

9-1  : भारताला पहिला धक्का

इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने दुसऱ्याच षटकात भारताला पहिला धक्का दिला. त्याने केएल राहुलला झेलबाद केले. राहुलने पुन्हा एकदा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विकेटकिपरकडे झेल देऊन माघारी परतला.

डोकेदुखी गेली! इंग्लंडने नाणेफेक जिंकली

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या झिम्बाब्वेच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंत संघात खेळणार आहे.

वाचा अॅडलेडवर टॉस हरणे का आहे महत्वाचे... Rohit Sharma : टॉस का बॉस रोहित अॅडलेडवर मात्र टॉस हरावा कारण..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com