IND vs ENG: वेगवान गोलंदाजाचा समावेश निश्चित; बिश्नोईला डच्चू मिळण्याची शक्यता; भारत-इंग्लंड आज लढत

India Likely to Make Bowling Changes for Third T20: भारत-इंग्लंड तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता असून रवि बिश्नोईच्या जागी वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला संधी मिळू शकते.
IND vs ENG

IND vs ENG

esakal

Updated on

नॉटिंगहॅम: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाला मागील चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय संघ उद्या (ता. ७) यजमान इंग्लंडचा सामना करणार आहे. रवि बिश्नोईच्या एका षटकात २९ धावांची लूट केल्यामुळे दुसऱ्या टी-२० लढतीत पराभवाची नामुष्की ओढवली. आता नॉटिंगहॅम येथील लढतीत एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रवि बिश्नोईला वगळून प्रिन्स यादवला टीम इंडियामध्ये संधी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com