
त्याच्या या कामगिरीमुळे विजय हजारे ट्रॉफीत केरळने उत्तर प्रदेशचा तीन विकेटने पराभव केला.
नवी दिल्ली- स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने अ वर्गातील क्रिकेटमध्ये 15 वर्षांत पहिल्यांदाच डावात पाच विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे विजय हजारे ट्रॉफीत केरळने उत्तर प्रदेशचा तीन विकेटने पराभव केला. 37 वर्षीय श्रीसंतची आयपीएल 2021 च्या लिलावात कोणत्याच संघाने दखल घेतली नव्हती. त्याने आठ वर्षांनंतर प्रथमश्रेणीचा सामना खेळताना 65 धावा देत पाच विकेट घेतल्या.
श्रीसंतने सलामीवीर अभिषेक शर्माच्या रुपात पहिली विकेट घेतली. त्यानंतर डेथ ओवरमध्ये पुनरागमन करत उत्तर प्रदेशचा कर्णधार भुवनेश्वर कुमार, मोहसीन खान, अक्षदीप नाथ आणि शिवम शर्मा यांची विकेट घेतली. भारतासाठी 27 कसोटी, 53 वनडे आणि 10 टी-20 खेळलेल्या श्रीसंतने ओडिशाविरोधात शनिवारी 41 धावा देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. उत्तर प्रदेशने 49.4 षटकांत 283 धावा बनवल्या. उत्तरादाखल केरळने 48.4 षटकांत 7 विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठले.
हेही वाचा- एअर इंडियाच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कारवाई करा; नेमबाज मनू भाकरची मागणी
इतर सामन्यात कर्नाटकने बिहारचा 267 धावांनी पराभव केला. कर्णधार आर समर्थने 144 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 158 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने 98 चेंडूत 97 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. कर्नाटकच्या तीन विकेटवर 354 धावांना उत्तर देताना बिहारचा संघ 87 धावांवरच आटोपला. तर रेल्वेने ओडिशाचा 8 विकेटने पराभव केला.
हेही वाचा- धक्कादायक:'फेक फेसबूक' पेजवरुन शेअर झाले गांगुलींच्या पत्नी आणि मुलीचे फोटो