INDvsENG 5th T20I : टीम इंडियाने टी-20तील नंबर वनची काढली हवा

India vs England 5th T20I, Virat Kohali, Suryakumar Yadav
India vs England 5th T20I, Virat Kohali, Suryakumar Yadav

जोस बटलर (52) आणि डेविड मलान (68) यांनी भक्कम पाया रचल्यानंतर अन्य खेळाडूंनी नांगी टाकल्यामुळे मालिकेत आघाडी मिळवलेल्या इंग्लंडवर मालिका गमावण्याची वेळ आली. 225 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला निर्धारित 20 षटकात 8 बाद 188 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय संघाने 36 धावांनी सामना जिंकत मालिका खिशात घातली. 

कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 80 धावा हार्दिक पांड्याने 17 चेंडूत कुटलेल्या 39 धावांच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडसमोर 225 धावांचे आव्हान ठेवले होते. मालिकेतील निर्णायक टी-20 सामन्यात रोहित-विराट या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 94 धावा केल्या. रोहित शर्मा 34 चेंडूत 64 धावा करुन परतल्यानंतर सुर्यकुमार यादव 17 चेंडूत 32 धावा करुन परतला. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या विराट कोहलीने धमाकेदार फलंदाजी करत संघाच्या धावफलकावर निर्धारित 20 षटकात 2 बाद 224 धावा लावल्या होत्या. ही दोघही नाबाद राहिली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने एक आणि अदिल राशीदला एक विकेट मिळाली.

कसोटी मालिकेत एकतर्फी संघार्षानंतर टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला कांटे की टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी टी-20 रँकिंगमधील नंबर एक असलेल्या इंग्लंड आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय  संघाने नाणेफेक गमावून सामना जिंकता येतो, हे दाखवून दिले होते. याची पुनरावृत्ती करत मालिका विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिका जिंकली. 

लाईव्ह अपडेट्स

174-8 : क्रिस जार्डनच्या रुपात शार्दुलच्या खात्यात तिसरी विकेट

168-7 : जोफ्रानं रन आउटच्या रुपात फेकली विकेट

165-6 : नटराजनने घेतली बेन स्टोक्सची विकेट, त्याने 14 धावा केल्या

142-5 : हार्दिक पांड्याने इयॉन मॉर्गनला अवघ्या एका धावेवर धाडले माघारी 

142-4 : डेविड मलानच्या रुपात टीम इंडियाला मिळाले मोठे यश शार्दुलने 68 धावांवर त्याचा खेळ केला खल्लास 

140-3 जॉनी बेयरस्ट्रो स्वस्तात माघारी, शार्दुलने घेतली विकेट

बटरल-मलान या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली

130-2 : बटलरच्या रुपात भुवीन टीम इंडियाला मिळवून दिली महत्त्वपूर्ण विकेट, त्याने 34 चेंडूत 52 धावा केल्या

0-1 : भुवनेश्वरने जेसन रॉयला दुसऱ्याच चेंडूवर धाडले माघारी

-----------------------------------------------------------------------------------------------

भारत निर्धारित 20 षटकात 2 बाद 224 धावा

143-2 : सीमारेषेवर जार्डन- जेसन रॉय यांच्यात कमालीचा ताळमेळ, सूर्यकुमार 17 चेंडूत 32 धावांवर झेलबाद
 

94-1 : बेन स्टोक्सने रोहित शर्माला केलं बाद, हिटमॅनने 34 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने कुटल्या 64 धावा
 

-भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत ज्या संघाने नाणेफेक जिंकली त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारत सामना जिंकल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण चौथ्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून सामना जिंकता येतो हे दाखवून दिले होते. 

- इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय़ घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com