Team India Squad for England Tour Announced : आयपीएलनंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून यावेळी पाच कसोटी सामन्यांची मालिक खेळवण्यात येणार आहे. यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीद्वारे आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने नव्या कर्णधाराची देखील घोषणा केली आहे.
बीसीसीआयने कर्णधार पदी शुभमन गिलची निवड केली आहे. तर उपकर्णधार म्हणून रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे. त्याच्याकडे यष्टीरक्षक म्हणूनही जबाबदारी असणार आहे. याशिवाय ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि करुण नायर यांना संधी मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मोहम्मद शमीला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आलं आहे.