VIDEO : अजिंक्यनं विकेट फेकली की जेमिसनने ती घेतली तुम्हीच ठरवा! |India vs New Zealand, 1st Test Day 1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ,  Rahane and Jamieson

अजिंक्य रहाणेनं चांगली सुरुवात केली खरी पण...

VIDEO : अजिंक्यनं विकेट फेकली की जेमिसनने ती घेतली तुम्हीच ठरवा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

IND vs NZ, 1st Test Rahane and Jamieson : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व करणारा अंजिक्य रहाणे संधीच सोनं करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर मध्यफळीत येऊन अजिंक्य रहाणेनं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर वैयक्तिक धावांसाठीचा संघर्ष संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरल्याचे संकेतही त्याने दिले. पण 35 धावांवर असताना जेमिसनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. चांगली सुरुवात करुनही त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले.

भारतीय डावातील 50 व्या षटकात जेमिसनने पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे विरोधात पायचितची जोरदार अपिल केली. मैदानातील पंचानीही बोट वर करत अजिंक्यला बाद दिले. पण कोणताही वेळ न दवडता अजिंक्यनं मोठ्या आत्मविश्वासाने रिव्ह्यू घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. चेंडूने बॅटची कड घेतल्यामुळे त्याला नॉट आउट देण्यात आले. पण हा आत्मविश्वासू निर्णय त्याला फारसा फायद्याचा ठरला नाही. पुढच्याच चेंडूवर बॅट आणि पॅटमधील अंतराने अंजिक्यचा घात केला. बॅटची कड लागून चेंडू यष्टीवर आदळला आणि अजिंक्यला तंबूत परतावे लागले.

हेही वाचा: VIDEO : शुबमन गिल भारी खेळत होता; पण...

अजिंक्यने विकेट फेकली की जेमिसनला ती मिळाली...

पहिल्या कसोटी सामन्यात सुरुवातीपासून प्रभावी मारा करणाऱ्या जेमिसनने अजिंक्य रहाणेच्या रुपात सामन्यातील तिसरी विकेट मिळवली. अर्धशतकीवर शुबमनला त्याने ज्याप्रमाणे बाद केले अगदी त्यापद्धतीने अजिंक्यही त्याच्या गळाला लागला. जेमिसनचा चेंडू हा ऑफ स्टम्पच्या बाहेर होता. अजिंक्यने बॅट क्रॉस केल्यामुळे तो चेंडू बॅटची कड घेऊन स्टम्पवर आदळला आणि अजिंक्यला विकेट गमवावी लागली. जर अजिंक्यने सरळ बॅटनने खेळण्याचा प्रयत्न केला असता तर टीम इंडियाला चौथा धक्का बसला नसता. ही विकेट जेमिसनला मिळण्यापेक्षा अंजिक्यने बेसिक चूक करुन ही विकेट गमावल्याचे दिसते.

हेही वाचा: IPL 2022 : MI रोहितसह या चौघांना करु शकते Retain

अंजिक्य रहाणेचा संघर्ष कायम

या वर्षभरातील कसोटी सामन्यांचा विचार केला तर अजिंक्य रहाणेनं 20 डावात अवघ्या 407 धावा केल्या आहेत. त्याच्या भात्यातून केवळ दोनच अर्धशतके निघली आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 63 चेंडूचा सामना करत मैदानात तग धरण्याचे धैर्य दाखवून अजिंक्यने धावांसाठी सुरु असलेला संघर्ष संपवण्याचे संकेत दिले. पण 35 धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. आपल्या या खेळीत त्याने 6 चौकार खेचले. जर त्याने अर्धशतक पूर्ण केले असते तर त्याचा आत्मविश्वास थोडा आणखी उंचावला असता.

loading image
go to top