VIDEO : बोल्ड झाल्यावर जाडेजा स्वत:वरच चिडला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Jadeja
VIDEO : बोल्ड झाल्यावर जाडेजा स्वत:वरच चिडला!

VIDEO : बोल्ड झाल्यावर जाडेजा स्वत:वरच चिडला!

हेही वाचा: "श्रेयस, तू ३०० रन्स केल्यास तरी तुला संघातून बाहेरच काढणार"

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पुजारा स्वस्तात माघारी फिरल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर येऊन पडली होती. त्याने पदार्पणातील सामन्यात आपल्यातील क्षमता सिद्ध करुन संघाला अडचणीतून बाहेर काढले. श्रेयस अय्यरला जाडेजाने दुसऱ्या बाजूने उत्तम साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव सावरला. दुसऱ्या दिवशीच्या खेळात जाडेजा आणखी काही उपयुक्त धावा करेल असे वाटले होते. पण साउदीने त्याला एकही धाव न करता तंबूत धाडले.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test Day 2 : साउदीचा पंजा; टीम इंडिया 300 पार...

कानपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 345 धावा केल्या आहेत. सलामीवीर शुबमन गिलने 93 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजाने 112 चेंडूचा सामना करताना 50 धावा केल्या. तळाच्या फलंदाजीत रविचंद्रन अश्विनने 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. न्यूझीलंडकडून टिम साउदीनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. कायले जेमिसनला 3 तर फिरकीपटू अजाझ पटेलनंही 2 विकेट घेतल्या.

loading image
go to top