IND vs NZ: कानपूरच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध घोषणाबाजी; व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs New Zealand, 1st Test Kanpur
IND vs NZ: कानपूरच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध घोषणाबाजी; व्हिडिओ व्हायरल

IND vs NZ: कानपूरच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध घोषणाबाजी; व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात रंगला आहे. पाच वर्षांनतर या मैदानात कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला असून रहाणेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय़ घेतला. सामन्याच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच प्रेक्षक गॅलरीतून घोषणाबाजी झाल्याचे पाहायला मिळाले. यात प्रेक्षकांनी 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशी नारेबाजी केली. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारतीय डावातील सहाव्या षटकात हा सर्व प्रकार घडला. मयंक अग्रवाल आणि शुबमन गिल फलंदाजी करत होते. त्यावेळी भारतीय संघाला प्रोत्साहन देताना प्रेक्षकांच्या गर्दीतून पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांनी वंदे मातरम् आणि भारत माता की जय अशी घोषणाबाजी देखील केली.

हेही वाचा: अय्यर-जाडेजाची बल्ले बल्ले! दिवसाअखेर टीम इंडिया 'फ्रंटफूटवर'

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मालिकेलाही ब्रेक लागला आहे. 2012-13 पासून या दोन्ही देशांतील द्विपक्षीय मालिका स्थगित आहे. आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडताना दिसते. युएईच्या मैदानात रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाने टीम इंडियाला पराभवाचा दणका दिला होता.

हेही वाचा: IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा!

वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला. या पराभवामुळे भारतीय संघाची स्पर्धेतील समीकरणं बदलली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवाने यात आणखी भर पडली आणि सरशेवटी टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. कानपूरच्या मैदानात प्रेक्षकांनी याच गोष्टीचा राग काढल्याचे पाहायला मिळाले.

loading image
go to top