IND vs NZ Semifinal : प्रशिक्षकाचं खास प्लॅनिंग सुरू... राहुल द्रविड संघाला हॉटेलमध्येच सोडून वानखेडेवर दाखल

IND vs NZ Semifinal
IND vs NZ Semifinal esakal

IND vs NZ Semifinal : भारतीय संघ वानखेडेवर न्यूझीलंडविरूद्ध दोन हात करण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. बंगळुरूमध्ये भारतीय संघाने नेदरलँड्सला मात दिल्यानंतर संघ मुंबईत दाखल झाला आहे. संघ जरी आज मुंबईत पोहचला असला तरी आज रेस्ट डे असल्याने सर्व खेळाडू हॉटेलमध्ये आराम करत आहेत. मात्र प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र एका वेगळ्याच मिशनवर आहे.

राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफ हा थेट वानखेडेवर दाखल झाला. तेथे त्यांनी खेळपट्टीची पाहणी केली. द्रविडसोबत यावेळी फलंदाजी कोच विक्रम राठोड, गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे देखील होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनल सामना हा 15 नोव्हेंबरला होणार आहे.

IND vs NZ Semifinal
World Cup 2023 : रोहितला डच्चू तर विराट कॅप्टन... क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा खोडसाळपणा

खास बाब म्हणजे राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि त्याच्या सपोर्ट स्टाफचा हा या स्पर्धेतील नेहमीचा कार्यक्रम आहे. त्यांनी इडन गार्डनवर देखील संघ दाखल झाल्या झाल्या आधी खेळपट्टी पाहिली होती. राहुल द्रविड हा खेळपट्टी पाहताना क्युरेटरशी देखील बोलताना दिसतोय.

वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजांचं नंदनवन समजली जाते. सेमी फायनल देखील फलंदाजीला पोषक खेळपट्टीच असेल. वानखेडेवर आतापर्यंत चार वर्ल्डकप सामने खेळले आहेत. ते सर्व सामने हाय स्कोरिंग सामने झाले आहेत.

IND vs NZ Semifinal
Morne Morkel : पाकिस्तानचा भारतातील वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळल्यानंतर संघात सुरू झालं राजीनामा सत्र?

जरी खेळपट्टी फलंदाजीला साथ देणार असली तरी या खेळपट्टीतून वेगवान गोलंदाजांनाही थोडीफार मदत मिळते. हे आपल्याला भारत - श्रीलंका सामन्यादरम्यान दिसून आलं आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांची भारतीय वेगवान गोलंदाजांचा सामना करताना भंबेरी उडाली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com