Ind vs Pak Asia Cup 2025
esakal
Watch the Super Four clash live for free on DD Sports without SonyLiv subscription : आशिया कपमध्ये शनिवारपासून सुपर ४ च्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. शनिवारी बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना पार पडल्यानंतर आज भारत पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान दुसऱ्यांदा आमने सामने येत आहेत. साखळी फेरीत पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर आता सुपर ४ मध्ये दुसऱ्यांदा पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.