Pakistan Players Who Mocked Operation Sindoor Fail
esakal
India vs Pakistan: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळावं की नाही, अशी चर्चा सुरु असतानाच काल भारत-पाकिस्तान सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानच्या संघात पलगाम हल्ल्यावेळी भारताची खिल्ली उडवणाऱ्या दोन खेळाडूंचाही समावेश होता. या खेळाडूचं प्रदर्शन मात्र, या सामन्यात खराब राहिलं. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं.